नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरू असताना, याच पार्श्वभूमीवर कोरोना लॉकडाउन काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या लॉकडाउनमध्ये जर तुम्ही ऑनलाईन सामान ऑर्डर करत असाल, तर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
लॉकडाउनमध्ये जर तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल, तर सध्या याची ऑनलाईन डिलीव्हरी मिळणे शक्य नाही. तसेच स्मार्टफोन, लॅपटॉपची रिटेल दुकानेही सुरू करण्यास परवानगी नसल्याने या वस्तू खरेदी करता येणार नाहीत.
या गाईडलाईन्स जारी
या काळात केवळ अत्यावश्यक सामानाचीच डिलीव्हरी केली जाईल. अमेझॉन ने आपल्या वेबसाईटवर, सरकारी गाईडलाईन्सनुसार, आम्ही केवळ अत्यावश्यक सामानाचीच डिलीव्हरी घेत आहोत, असे लिहिले आहे.
रिलायन्स डिजीटलनेही, सरकारी निर्बंधांमुळे या पिन कोडची डिलीव्हरी होल्डवर असून सरकारच्या आदेशानंतरच इतर डिलीव्हरी स्वीकारल्या जातील, असे सांगितले आहे.
फ्लिपकार्ट मोबाईल ऍपवरही, सरकारी नियमांनुसार, प्रत्येक झोनसाठी प्रोडक्टची उपलब्धता वेगवेगळी असेल, असे सांगितले आहे.
फ्लिपकार्ट मोबाईल ऍपवरही, सरकारी नियमांनुसार, प्रत्येक झोनसाठी प्रोडक्टची उपलब्धता वेगवेगळी असेल, असे सांगितले आहे.