बापरे ! जमाव संतापला, अन् पोलिसांवरच हल्ला चढवला

अहमदनगर - कडक लॉकडाऊन असतानाही नागरिकांची जमलेली गर्दी पांगविण्यासाठी पेालिस आले. पण त्यांना पाहून संतापलेल्या जमावाने थेट पोलिसांवरच हल्ला केला. सुमारे शंभर ते दीडशे जणांनी दगडफेक केल्याने पोलिसांच्या वाहनांचे नुकसान झाले. नंतर अतिरिक्त बंदोबस्त मागवला. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली.

या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करून संशयितांची धरपकड सुरू केली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत जमावातील लोकांचे शोध सुरू होते. जमावाच्या दगडफेकीत दोन पोलिस जखमी झाले आहेत. तीन बत्ती चौकात ही घटना घडली. या घटनेमुुळे शहरात पाेलिस बंदोबस्त वाढवलेला होता.

याप्रकरणी पोलिस कर्मचारी सलमान शेख यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी जुबेर हॉटेलचा चालक, तेथील सर्व कर्मचारी, निसार खिचडीवाला, जाकीर खान, मोहम्मद हनीफ रशीद शेख, अरबाज शेख यांच्यासह अन्य अनोळखी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला.

या आरोपींच्याा विरोधात दंगल करणे, सरकारी कामात अडथळा आणणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहेत. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर बहुतांश आरोपी पळून गेले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस अधीक्षकांनी शहरात भेट देवून माहिती घेतली  आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !