नाशिकमध्ये 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन : भाजीपाला आणि किराणा घेण्यासाठी 2 दिवसांची मुभा

नाशिक (टीम MBP LIVE 24) : 

नाशिकमध्ये कोरोना संसर्गाने थैमान घातले असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये 10 दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत.


12 ते 22 मे लॉकडाऊन

नाशिकमध्ये 12 ते 22 मे या पुढील 10 दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी याबद्दल माहिती दिली आहे.  वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. औद्योगिक वसाहती देखील केवळ इन हाऊस सुरू राहणार आहेत.

हे राहणार सुरू
जीवनावश्यक वस्तूमध्ये भाजीपाला, दूध, किराणा दुकाने देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे.  मेडिकल कारण वगळता इतर कोणतेही कारणा शिवाय बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल पंपावर देखील केवळ अत्यावश्यक वाहनांना इंधन मिळणार आहे.

दोन दिवस मुभा
भाजीपाला आणि किराणा दुकानं 10 दिवस बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजीपाला आणि किराणा घेण्यासाठी नाशिकरांना 2 दिवसांची मुभा देण्यात आली आहे.  नाशिक जिल्ह्याबाहेर किंवा जिल्ह्यात अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्यांना पास बंधनकारक असणार आहे.


Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !