मुंबई : राज्याला तौत्के चक्रीवादळाचा फटका बसला असताना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि अमृता फडणवीस यांच्यात ट्विटर वॉर रंगले आहे. "जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नहीं देती !", या अमृता फडणवीस यांच्या शायरीला रुपाली चाकणकर यांनीही शायरीनेच चोख उत्तर दिले आहे.
सोमवारी समुद्रात उंचच उंच लाटा उसळल्या होत्या. याचा मोठा फटका भारताच्या पश्चिम किनारपट्टीला बसला असून अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. या वादळाला अनुसरुन अमृता फडणवीस यांनी शायरी केली होती.सोशल मीडियावर तौत्के चक्रीवादाळावरुन जोक्स व मिम्स व्हायरल होत आहेत. अमृता फडणवीस यांनी शायरीतून चक्रीवादळाचे वर्णन करताना, प्रश्न विचारला होता. त्यांच्या या शायरीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही शायरीतूनच उत्तर दिले होते. आता, अमृता फडणवीस यांनी शायरी ट्विट करुन टीकाकारांना सुनावले आहे.
जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो,
शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नहीं देती !
असे ट्विट अमृता यांनी केले आहे. अमृता यांच्या ट्विटनंतर रुपाली चाकणकर यांनीही या ट्विटला अनुसरुनच ट्विट केलेय. त्यामध्ये, शेरनी असे वर्णनही केले आहे.
जंगल की शेरनी शिकार करती है...
सर्कस की शेरनी सिर्फ मनोरंजन, असे ट्विट रुपाली
चाकणकर यांनी केले आहे.
अमृता फडणवीसांची पहिली शायरी
तुफाँ तो इस शहर में अक्सर आता है,
देखें अबके किसका नंबर आता है!, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते. त्यावर, रुपाली चाकणकर यांनीही शायरीतूनच उत्तर दिले.
तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है
महाराष्ट्र इसके साथ तो हमेशा खेला है, साथ मैं हिंदोस्तां को भी संभाला है !!, असे ट्विट रुपाली
चाकणकर यांनी केले आहे.