कारवाई : शेवगाव तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची डॉ. विकास बेडकेंना नोटीस

शेवगाव ( MBP LIVE 24 टीम ) :

शेवगाव पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकारी एस. एम. हिराणी यांनी डॉ. विकास बेडके यांना नोटीस काढुन त्यांच्या विरोधातील तक्रारींबाबत म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. दरम्यान, कुद्दुस पठाण यांनी आपल्या जीवावर बेतणारी चुकीची ट्रीटमेंट डॉ. बेडके यांनी दिल्याबाबतची तक्रार तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे केलेली आहे.



काय बजावलीय नोटीस
तालुका आरोग्य अधिकारी यांनी 24 मे रोजी काढलेल्या नोटीसीत म्हटले आहे, की कुददुस बिबन पठाण (रा.मुंगी ता. शेवगाव) यांनी दि. ७ मे २०२१ च्या अर्जाद्वारे स्वतःवर चुकीची ट्रिटमेंट केलेकामी तक्रार केलेली आहे. तरी सोबत जोडलेल्या तक्रार अर्जातील बाब निहाय आपले काय म्हणणे आहे याचा वस्तुनिष्ठ अहवाल या कार्यालयात सादर करावा.

कुद्दुस पठाण यांनी 1 मार्च रोजी डॉ. विकास बेडके यांच्या विरोधात तक्रार अर्ज करून गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाकडे शेवगावसह तालुक्यातील लोकांचे लक्ष लागले आहे.

डॉ. बेडके यांच्या उत्तराकडे लक्ष
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या नोटिशीला उत्तर देताना डॉ. बेडके आपल्या म्हणण्यात काय अहवाल सादर करतात, तसेच तो कधी मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, पठाण यांनी केलेल्या तक्रारीत गंभीर मुद्दे उपस्थित केलेले आहेत. रुग्णांच्या आरोग्याशी निगडित हा विषय असल्याने याचे गांभीर्य वाढले आहे.

काय केलीय तक्रार
पठाण यांनी तक्रारीत म्हटले आहे, की मी ७/१०/२०२० या तारखेला अथर्व हॉस्पिटल शेवगाव येथे ऍडमिट झालो होतो. या काळात आयुर्वेदीक डॉक्टर असताना माझ्या जिवावर बेतणारी अॅलोपॅथीची ट्रिटमेंट देऊन डॉ. विकास बैडके यांनी माझ्या जिवाला धोका निर्माण केला होता. या संबधात डॉ. बेडके यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन मला न्याय मिळावा. तसेच यासाठी आपल्याकडे १ मार्च २०२१ , ११ एप्रिल २०२१ व  २७ एप्रिल २०२१ या तारखेस तक्रार अर्ज साद केलेले आहेत. 

दरम्यान डॉ. बेडके अथर्व हॉस्पिटलमध्ये आय.सी.यु. चालवतात. त्याचबरोबर आयुर्वेदीक डॉक्टर असतांना अॅलोपॅथीची ट्रिटमेंट देतात. या ठिकाणी आय.सी.यु. चालवण्यासाठी आणि अॅलोपथीची ट्रिटमेंट देण्यासाठी कायदेशीर फिजीशियनची (एम.बी.बी.एस.+एम.डी.) कायदेशी आवश्यकता असते. त्यानुसार अथर्व हॉस्पिटलला सुरुवात झाली तेव्हापासून येथे आय.सी.यु. आहे. मग त्या ठिकाणी फिजीशियन डॉक्टर कोण काम पाहत आहे, तसेच हॉस्पिटलने किती बेडची परवानगी घेतली आहे. 

या संबंधातील सर्व कागदपत्रांची आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीची तपासणी करून संबंधित डॉक्टरवर योग्य ती कायदेशीर चौकशी करावी. त्याच बरोबर सदर हॉस्पिटलला कोवीड सेंटरची मान्यता कशी मिळाली म्हणून शेवगाव नगर परिषदेकडे अर्ज सादर केला होता. 

त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार नियमांना डावलून नगर परिषदेने अथर्व हॉस्पिटलला नाहरकत दाखला दिल्याचे समोर आले आहे. या बाबत अथर्व हॉस्पिटलला कोवीड सेंटरची परवानगी का देऊ नये, या संबंधातील नगर परिषदेच्या टाऊन प्लॅनिंगच्या अभियंत्याने दिलेला तपासणी अहवाल या अर्जासोबत जोडत आहे.

सदरचा अहवाल डावलून अथर्व हॉस्पिटलला नगर परिषदेने नाहरकत दिले कसे, याची चौकशी होऊन संबंधितावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !