दिलासादायक : राज्यात कोरोना रुग्णसंख्या घटली

 मुंबई : राज्यात कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 34 हजार 848 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली असून 960 रूग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे 59 हजार 73 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकुण कोरोना रूग्णांची  संख्या 53 लाख 44 हजार 63 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत मृत पावलेल्या रूग्णांची संख्या 4 लाख 94 हजार 32 इतकी आहे. 

मुंबईत देखील कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 1 हजार 147 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर 62 जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. गेल्या 24 तासांत 2 हजार 333 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 36 हजार 674 इतकी आहे.  

कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज 481 कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज 783 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5 हजार 447  इतकी आहे. आज 18 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

जळगाव जिल्ह्यात आज 618 कोरोना बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या  1 लाख 34 हजार 511 आहे. जिल्हात आज 11कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 


Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !