कायदा फाट्यावर ! बोधेगाव आरोग्य केंद्र 'रामभरोसे'; भलत्याच लोकांनी घेतलाय ताबा

शेवगाव (MBP LIVE 24) - बोधेगाव आरोग्य केंद्राचा कारभार काही स्थानिक भलतेच लोक पहात असल्याची गंभीर बाब परवा समोर आली आहे. येथे नियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक परदेशी यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथील कर्मचारीही मोकाट वागत असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत लसीकरणावेळी झालेल्या गोंधळाच्या निलेश ढाकणे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे केलेल्या व्हिडिओतुन स्पष्ट होत आहे. 

यामुळे येथे कशा पद्धतीने रुग्णालयातील यंत्रणेचा ताबा सबधितांनी घेतल्याचा पूर्णपणे 'आखोदेखा हाल' सर्वांसमोर चित्रित झाला आहे. हा कायदेशीर पुरावा समजून संबंधितांवर जिल्हाधिकारी यांनी कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे.

व्हिडीओ मधील आखोंदेखी

याबाबतच्या व्हिडिओ मध्ये कैद झालेली सविस्तर घडलेली घटना अशी, की सकाळी सात वाजता लसीकरण सुरू होईल असा मेसेज लोकांना रुग्णालयातील डॉक्टर आणि यंत्रणेद्वारे पाठवण्यात आला होता. त्यानुसार लांबून लोक पहाटेच घरातून निघून सहा वाजण्याच्या सुमारास बोधेगाव आरोग्य केंद्रात पोहोचले. प्रत्यक्षात मात्र त्यांना टोकन देण्यास येथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी असमर्थता दर्शविली.

रात्री नोंद केली कशी आणि कोणी..?

तसेच लसीकरणासाठीची नोंद रात्रीच झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लोकांचा संताप अनावर झाला. रात्री नोंद केलीच कशी असा जाब विचारल्यावर मात्र संबंधित कर्मचाऱ्यांना उत्तरे देणे अवघड झाले. आम्ही नोंद केली नाही. तसेच कोणी नोंद केली हे आम्हाला माहीत नाही अशी अजब भूमिका आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली.

बाहेरील व्यक्ती ताबा घेतेच कशी..?

येथील जबाबदार कर्मचाऱ्यांनाच हे माहीत नसेल तर मग येथील कारभार कोण चालवतोय. बाहेरील व्यक्ती येऊन सरकारी हद्दीतील कारभार हातात घेत असतील तर ही बाब गंभीर आणि पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सरकारी पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा गंभीर प्रकार होत असेल तर बाब आणखीनच गंभीर आहे. त्यामुळे येथे सर्व अनागोंदी सुरू असल्याचे स्पष्ट होते. मग या अनागोंदी कारभारास जबाबदार कोण?


दमबाजी केलीच कशी..?

सदरच्या व्हिडीओ मध्ये लाल टी-शर्टवरील व्यक्ती, "मी अनिल गीते आहे आणि येथील लसीकरणासाठी च्या नोंदी मी वहीत केल्या आहेत. तसेच तुम्हाला काय करायचे ते करून घ्या," अशी दमबाजी देखील लांबून लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना करताना दिसत आहे. 

सरकारी जागेत येऊन लोकांना खुलेआम दमबाजी करणारा ही अनिल गीते नाव सांगणारी व्यक्ती कोण आहे, याचा शोध पोलिसांनी घेऊन सबधितावर सरकारी कामात हस्तक्षेप केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. या घटनेमुळे 'बोधेगावचे बिहार झाले काय', असे म्हणण्याची वेळ आली.


चौकशी होऊन कायदेशीर कारवाईची मागणी

रुग्णालयाच्या आवारात सरकारी मालमतेमध्ये बाहेरील गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन दमबाजी करत असतील तर यांना ही परवानगी येथील डॉक्टरांनी दिली काय, असा प्रश्न जनतेमधून उपस्थित केला जात आहे. एव्हढा गंभीर प्रकार येथे घडत असताना येथे नियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक परदेशी काय करतात? 

की त्यांच्या पाठींब्यानेच ही मंडळी रुग्णालयाचा ताबा घेत आहेत, याचा तपास होऊन पुढील कायदेशीर कारवाई होण्याची गरज आहे. अशी दमबाजी होणार असेल तर नागरिक, सर्वसामान्य रुग्ण येथे भीतीपोटी येतील कसे, असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.


डॉ. दीपक परदेशी 'नॉट रीचेबल', रुग्ण वाऱ्यावर

व्हिडीओमध्ये बोधेगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक परदेशी यांचा मोबाईल नंबर संबंधित नागरिकांनी येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना विचारला. त्यावर तेथील काटे नावाच्या कर्मचाऱ्याने 9922750049 हा मोबाईल नंबर सांगितला. तो नंबर लगेच मोबाईलवर डायल केला मात्र तो 'स्विच ऑफ' होता.

कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी मोबाईल स्विच ऑफ करून शेवंगावला असतील तर मग दाद मागायची कुणाकडे?  वैद्यकीय अधिकारी येथे उपस्थित नसतात, ते राहायलाही शेवंगावला आहेत. मग रुग्णांना सेवा मिळणार कशी? 

सरकारी पगार घेऊन अधिकारी नोकरीच्या ठिकाणी थांबतच नसतील, तर अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करून दुसऱ्या गरजूना संधी दिली पाहिजे. जेणेकरून रुग्णांची होणारी हेळसांड थांबेल.


पोलीस यंत्रणेने लक्ष घालण्याची गरज

व्हिडीओद्वारे व्हायरल झालेल्या दमबाजीमुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहेत.
याठिकाणी कोणीही ऐरेगैरे येऊन सरकारी यंत्रणा ताब्यात घेत असतील तर पोलीस बंदोबस्तात रुग्णांना उपचार व नागरिकांना लसीकरण करण्याची मागणी जनतेमधून केली जात आहे.

बोधेगाव आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभाराचा
भांडाफोड करणारा हाच तो व्हिडीओ !

https://m.facebook.com/story.php?story_fbid=494374421898598&id=100039781328011&sfnsn=wiwspwa

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !