'बेडका'च्या साक्षीला '420 लांडगा'

टपाट नगरात एक बेडूक रहात होता. स्वतःच्या पोटाची तुंबडी भरण्यासाठी तो थेट लोकांवर हल्ला करून त्यांच्या जीवाशी खेळायचा. अडचणीत आला की याच अवैध मार्गाने जमविलेल्या पैशांच्या माजावर भानगडी मिटवायचा. त्याचा हा बेकायदेशीर कारभार एकदा त्याच्या चांगलाच अंगलट आला. कारण, त्याचा पैशाचा माज, भाडोत्री मसल पावर काही कामी येईना. कारण, समोर होता "बब्बरशेर". यावेळी भानगड देखील मोठीच करून ठेवली होती. त्या पापातून सुटका होईना म्हणून त्याने आणखी घोड चूक केली. या कायद्याच्या चक्रव्यूहातुन बाहेर पडण्यासाठी त्याने एका 'जेलवारी' केलेल्या भामट्या '420 लांडग्या'ची संगत धरली.


लोकांच्या पैशावर डल्ला मारणे, प्रसंगी लोकांकडून हातपाय जोडून भीक मागून पैसे आणायचे आणि ते बुडवायचे अशी या '420 चोरा'ची जीवन जगण्याची  पद्धत. नगरात या भामट्याने अनेकांना टोप्या घातलेल्या. त्यामुळे फसवणुकीचे 420, 138 असे अनेक गुन्हे या भामट्या विरुद्ध दाखल झाले. त्यामुळे '420 लांडगा' म्हणून त्याला ओळखायला लागले. 

नगरीत त्याला कोणी कामावर घेईना. उपाशी मरायची वेळ आली. हे कमी म्हणून नदी पल्याडच्या पठाण वाडीत जाऊन त्याने पुन्हा तीच काशी घातली. पुन्हा पैशांचा गफला केल्याने या भामट्या 420 लांडग्याला सैनिकांनी चांगलाच लाताखाली तुडवला, नंतर काही महिने अंधार कोठडीत डांबून ठेवले.  पण, जित्याची खोड मेल्याशिवाय थोडीच जातेय. लोकांना फसविण्याचे, लुटण्याच्या कामातच हा भामटा धन्यता माणतोय.

हा अट्टल गुन्हेगार बेडकाने बरोबर घेतला, स्वतःची पापातून सुटका करण्यासाठी. आता "डोळे मिटून चोरून दूध पिणाऱ्या मांजरा (बेडूक) ला हा लोकांच्या पैशांवर डल्ला मारणारा दरोडेखोर बोका (लांडगा) संगतीला आला म्हणून काय फरक पडायचाय". त्यामुळे व्हायचं तेच झालं. या 'चारशेवीस' भामट्याबरोबर पापी बेडकाचीही चांगलीच वरात निघाली गावभर. सगळीकडे 'छि-थू' झाली या दोघांवर. 

कारण, या महाभागांच्या 'घाणेरड्या प्रतापां'ना नगरातील लोकं चांगलीच ओळखतात. सराईत अट्टल भामट्या लांडग्यासोबत बेडूक गेल्याने लोकांनी दोन 'महाचोरां'ची अभद्र युती झाल्याने, समजायचे ते समजून घेतले.

परिणामी बेडकाच्या अडचणी आणखीनच वाढल्यात. भामट्या '420 लांडग्या'समोर हाड रुपी टाकलेली बिदागी पण गेली आणि उलट आणखी एक गुन्हा वाढवून ठेवला. आता हा निस्तरायची वेळ बेडकावर आलीय. बेडूक या 'चारसोबीस'च्या नादाला लागून पुरता अडकला. 'चारसोबीस लांडगा' मात्र बेडकाकडून मिळालेल्या हाडाला चघळत बसलाय.

अडचणी वाढल्याने बेडकावर मात्र "तेल गेलं, तूप गेलं, हाती आलं धुपाटण" असं म्हणत डोकं बडवायची वेळ आलीय.

कारण आता बेडकाला गेल्या काही वर्षांत अनेकदा केलेली 'भामटेगिरी, गुन्हेगारी' ( 'गज'वाडीतलं पोरीबरोबरचं लफडं, अनेक गर्भ पाडण्याबाबतची पेंडिंग कारवाई, विणापरवाना विकलेली दवाई, चुकीचे 'गोरख धंदे' ) पुराव्यासह कायद्याच्या कचाट्यात अडकवू शकते. या भीतीने बेडकाला तोंड दाबून मुक्क्यांचा मार बसल्यागत गप्प बसण्याची वेळ आलीय.


जैसी करणी, वैसी भरणी..!

- साठाउत्तराची कहाणी सकळसंपन्न

शिकवण :
- संगत नेहमी चांगली असावी. अन्यथा 420 भामट्यांच्या नादाला लागल्यास आणखी संकट ओढवते. तो भामटा 420 स्वतःची आधीच वाट लावून बसलाय, मात्र त्याच्या संगतीमुळे पापी बेडकावरही अनेक गुन्हे दाखल होऊन 'जेलवारी' करण्याची वेळ येईल.

- स्वतःची चूक मान्य करण्यात शहाणपण असतं. अन्यथा एक चूक लपविण्यासाठी अनेक चुका, गुन्हे उघड होतात आणि आयुष्याचं मातेरं होतं.


वाचक मित्रांनो, ही गोष्ट कशी वाटली,
 ते कमेंट करून नक्की सांगा

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !