अन्यायाविरुद्ध एल्गार : डॉ. बेडकेला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाचा उपोषणाद्वारे निषेध, आता आत्मदहनाचा ईशारा

शेवगाव  (MBP LIVE 24) :

आयुर्वेदिक डॉक्टर असताना जीवावर बेतणारी चुकीची ऍलिओपॅथी ट्रीटमेंट दिल्याने झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसणीबद्दल डॉ. विकास शंकर बेडकेवर कायदेशीर कारवाईची मागणी स्थानिक आरोग्य प्रशासनाकडे पीडित कुद्दुस बिबन पठाण यांनी केलेली आहे. मात्र वैयक्तिक संबंधामुळे डॉ. विकास बेडकेला पाठीशी घालणाऱ्या स्थानिक आरोग्य प्रशासनाचा निषेध पठाण यांनी लाक्षणिक उपोषणाद्वारे केला आहे. तसेच आता थेट आत्मदहन करणार असा इशाराही यावेळी पठाण यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.



मुंगी तलाठी कार्यालया समोर उपोषण
मुंगी येथील तलाठी कार्यालया समोर गुरुवारी कुद्दुस पठाण यांनी एकट्याने लाक्षनीक उपोषण करून डॉ. बेडकेला पाठीशी घालणाऱ्या स्थानिक आरोग्य प्रशासनाचा निषेध केला आहे. कोरोना लोकडाऊन नियमावलीचे पालन करून पठाण यांनी एकटेच बसून उपोषण केले. यावेळी प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही.

आत्मदहनाचा ईशारा
गेल्या अनेक महिन्यापासून पीडित पठाण यांनी स्थानिक आरोग्य प्रशासनास अनेकदा तक्रार अर्ज करून न्यायाची मागणी केली आहे. उपोषणाचा इशाराही दिला होता. मात्र, डॉ. बेडकेला पाठीशी घालवायचे ठरवून स्थानिक प्रशासन कुंभकर्णी झोप घेत आहे. या कुंभकर्णी झोपेतील प्रशासनास जागे करण्यासाठी आता कुटूंबासह आत्मदहन करण्याची भूमिका, पीडित पठाण यांनी घेतली आहे. यापुढील सर्व परिणामास डॉ. बेडके व स्थानिक प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही पठाण यांनी जारी केलेल्या एका व्हिडिओ द्वारे दिला आहे.
             
काय आहे प्रकरण
तहसीलदार यांच्याकडे उपोषणाबाबत 27 एप्रिल रोजी केलेल्या तक्रार अर्जामध्ये कुद्दुस पठाण यांनी म्हटले आहे, की डॉ विकास बेडके हे आयुर्वेदिक डॉक्टर असताना ऍलिओपॅथीची ट्रीटमेंट  करून माझ्या जीवितास धोका निर्माण केला आहे. या प्रकरणी मी डॉ विकास बेडके याच्या विरोधात एक मार्च रोजी सम्बधित मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्री आरोग्य अधिकारी, तहसीलदार, पोलीसनिरीक्षक, पोलीसअधीक्षक पोलीसआयुक्त, आरोग्य अधिकारी अहमदनगर, जिल्हाशल्यचिकित्सक नगर ,आरोग्य आयुक्तालय, पोलिस महासंचालक मुबई यांना तक्रार अर्ज दिला आहे. तसेच प्रत्येकी तीन वेळेस स्पीडपोस्ट व काहींना स्वतः जाऊन तक्रार अर्ज दिले आहेत. मात्र, वैयक्तिक संबंध आणि दबवातून डॉ. बेडकेला पाठीशी घातले जात आहे. त्यामुळे डॉक्टर बेडकेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा मी लाक्षणिक उपोषण करेल, असा इशारा दिला होता.


वैयक्तिक 'हितसंबंधा'मुळे घातले जातेय पाठीशी
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वैयक्तिक संबंधामुळे डॉ. बेडकेला पाठीशी घालत असल्याचा आरोप पीडित पठाण यांनी केला आहे. डॉ. काटे हे खासगी प्रॅक्टिस करत असून स्वतःचे स्कॅन सेंटर चालवितात. या ठिकाणी पेशंट पाठविण्याचे काम डॉ. बेडके करतात. यात त्यांची आर्थिक साटेलोटे आहे. तसेच बोधेगाव चे वैद्यकीय अधिकारी दीपक परदेशी हे डॉ. बेडकेबरोबर त्यांच्या अथर्व हॉस्पिटलमध्ये खासगी प्रॅक्टिस करतात.  त्यामुळे डॉ. काटे व डॉ. परदेशी हे मिळून डॉ. बेडके यांना पाठीशी घालत आहेत, असा पठाण यांचा आरोप आहे. 



Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !