मनोरंजन टीम - संजय गुप्ता दिग्दर्शित ‘मुंबई सागा’ हा सिनेमा या वर्षात सर्वाधिक अपेक्षेने रिलीज झालेला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाचा एक ट्रॅक रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. होय. तोच ट्रॅक, जो गेले काही दिवसांपासून सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. इमरान हाश्मी याच्यावर चित्रित झालेला 'लुट गये' हेच ते गाणे.
छायाचित्र सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस |
'लुट गये' या गाण्यामध्ये पोलिस निरीक्षक विजय दांडेकर यांच्या भूमिकेत इमरान हाश्मी आहे. इमरान हाश्मीने या गाण्यात साकारलेली पोलिसांविषयी कहाणी खरी आहे. जो नंतर एका अपघाताने वधूच्या प्रेमात पडला. या गाण्याच्या अखेरीस याविषयी माहिती दिलेली आहे.
हे गाणे निर्मात्यांनी विजय दांडेकर यांच्या अतुलनीय प्रेमकथेची खरी कहाणी असल्याचे सांगितले आहे. वास्तवात ही घटना 1991 मध्ये घडल्याचेही उघड झाले आहे. या ट्रॅकवरून असे दिसते की अधिकाऱ्यांचा पाठलाग गुंडांनी कसा केला. त्यात हे अधिकारी जखमीही झाले होते.
गुंडांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हे अधिकारी एका हॉटेलमध्ये येतात. तेथे वधूबरोबर व्यस्त असलेल्या हॉटेलच्या खोलीत हा पोलिस अधिकारी लपतो. तेथे दुसरी कहानी अशी आहे की, या वधूला लग्न करायला भाग पाडलं गेलं होतं आणि तीसुद्धा रडत होती.
गुंडदेखील पाठलाग करीत त्या हॉटेलात येतात. तेथे पोलिस अधिकाऱ्यासोबत त्यांची चकमक होते. आणि यातच त्या नववधूला गुंडांनी गोळ्या घातल्याचे दिसते. यात ज्या पोलिसांची कहाणी दाखविली गेली, ते प्राणघातक चकमकीचे पोलिस निरीक्षक विजय दांडेकर होते.
हे गाणे जुबिन नौटियाल यांनी गायले असून त्याला तनिष्क बागची यांनी संगीत दिले आहे. या गाण्याचे बोल मनोज मुंताशिर यांनी लिहिले आहेत. या गाण्यात युक्ती थरेजा ही महिला मुख्य भूमिकेत आहे. युट्युबवर तसेच एमपीथ्री प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यापासूनच या गाण्याने धुमाकूळ घातला आहे.
मुंबई सागा हा चित्रपट दि. १ मार्च, २०२१ रोजी प्रदर्शित झाला आहे.यात मुंबईचा मुंबई ते मुंबईचा प्रवास दाखविण्यात आलेला आहे. तसेच गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेली पटकथा आहे. सिनेमापेक्षाही हे गाणेच रसिकांनी डोक्यावर घेतले आहे. जुबिन नौटियालचा आवाज रसिकांच्या पसंतीस पडलेला आहे.