अहमदगर - ग्रामीण भागातील रुग्णाचे प्रचंड हाल होत आहेत. आरोग्य विभागातील सर्व लोक चांगले काम करत आहेत. पण त्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. मग झेडपी तेथे चौदाव्या वित्त आयोगाचा निधी का वापरत नाही, सवाल भाजप गटनेते तथा झेडपी सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुरेसा औषधसाठा नाही. वाहने नाहीत, लस नाही, तपासणी किट नाही, उपचाराचे संसाधन नाहीत. ग्रामीण भागातील रुग्णाला रेमडेसीव्हीर मिळत नाही, मग झेडपीचे तेथे चौदाव्या वित्त आयोगाचा निधी वापरावार. कारण बरेच जि. प. सदस्य जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत.
मागच्याही कोरोना काळात जिल्हा नियोजनाला ७२ कोटी मिळाले. त्यातले ३२ कोटी खर्च झाले. बाकी निधी पडून असल्याचा आरोप वाकचौरे यांनी केला आहे. खर्च किती झाला, कुठे झाला, किती नियोजन समिती सदस्यांना डिपीओ सांगितला, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
आताही ३० टक्के निधी कोरोनासाठी वापरायचा आहे. तो वापरालाही पाहिजे. कारण संकट मोठेच आहे, परंतु आमच्या अकोल्यात कोविड सेंटर चालु आहे. आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधे तेथे देतात. ते पण कमी पडतात. मग तेथे लोकवर्गणी काढून औषधे घावे लागतात.
कोरोनासाठी नियोजन समितीचा निधी ग्रामीण भागात का दिला जात नाही? सगळा निधी सिव्हीलला केला जातो, असे वाकचौरे म्हणाले. तिथे पण द्या ती आपलीच माणसे आहेत, पण ग्रामीण भागात पण द्या. पालकमंत्री जिल्ह्यात आहेत, त्यांना कोणी तरी अवगत करावे, असे वाकचौरे म्हणाले.
जालिंदर वाकचौरे यांनी सुचवले हे उपाय
गरज आहे तेथे रुग्णवाहिका द्या.
चौदाव्या वित्त आयोगाचा निधी वापरा
ते २२ कोटी आता तरी लोकांसाठी वापरा