हेल्पलाईन | 'हा' टोल फ्री क्रमांक फिरवा, आणि उपलब्ध 'बेड्स'ची माहिती मिळवा

अहमदनगर - जिल्हयातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आता कंट्रोल रूम (नियंत्रण कक्ष) कार्यान्वित करण्यात आला आहे. 


जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या निर्देशानुसार हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. त्याचा दूरध्वनी क्रमांक 0241-2345460  असा आहे. 

या 'कंट्रोल रुम'साठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांची तर सहाय्यक अधिकारी म्हणून जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती मिळावी, यासाठी नागरिकांनी या 'कंट्रोल रुम'शी संपर्क साधावा. ही कंट्रोल रुम २४ तास सुरु राहिल, अशी माहिती जिल्हाधिकारी भोसले यांनी दिली आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !