ऍक्शन मोड ! शेवगाव तहसीलदारांच्या आजच्या 'कोविड ऑडिट'मध्ये दवाखान्यांचे पितळ पडणार उघडे

आज शहरातील सर्वच डॉक्टरांची कसून दप्तर तपासणी करून सर्व दवाखाने, हॉस्पिटलची 'कोविड ऑडिट' तपासणी तहसीलदार भाकड या करणार आहेत. त्यामुळे या ऑडिट मध्ये कोणाचे पितळ उघडे पडणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

बेकायदेशीर कोविड पेशन्ट तपासणाऱ्या डॉक्टरांचे हॉस्पिटल सील करणार - तहसीलदार 

शेवगाव - कुठलीही परवानगी नसताना बेकायदेशीरपणे कोविड रुग्णांची तपासणी केली जात आहे, त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात घालणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कारवाई करून हॉस्पिटल सील करणार असल्याची माहिती तहसीलदार अर्चना भाकड यांनी 'MBP Live24' ला बोलताना दिली आहे.

दोन दिवसांमध्ये तहसीलदार भाकड यांनी शहरातील ८ हॉस्पिटलची पहाणी केली आहे. या पाहणीत भयानक वास्तव समोर आले आहे. काही हॉस्पिटलचा सावळा गोंधळ समोर आला असून डॉक्टरांचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे. 

कोणतीही परवानगी न घेताच कोविड रुग्णांना बेकायदेशीरपणे ट्रीटमेंट देण्याचा उद्योग सुरू असल्याचे दिसून आले, अशी धक्कादायक माहिती तहसीलदार भाकड यांनी दिली आहे.

पाहणीत हे निरीक्षण आढळले 

- परवानगी नसताना कोविड पेशंटला ऍडमिट करून घेतलेले होते.

- बहुतेक हॉस्पिटलमध्ये फिजिशियनच नाही

- पेशंटला रेमडिसिव्हीर इंजेक्शन्स दिल्याचे आढळून आले. 

- केवळ पेशंटच्या सिटीस्कॅन रिपोर्टवर त्याच्यावर कोविड साठीची ट्रीटमेंट केली जात आहे.

- कोविड टेस्ट न करता कोविड पेशंट लपवले जात आहेत. 

आज बोलावली तातडीची बैठक

उद्या सोमवारी (ता. १२) सकाळी ११ वाजता डॉक्टरांची तातडीची मिटींग बोलावण्यात आली आहे. यावेळी १ मार्चपासून डॉक्टरांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये किती कोविड रुग्ण तपासले, याची माहिती आणण्यास सांगितली आहे. 

तसेच किती रुग्णांच्या कोविड टेस्ट केल्या. त्यापैकी किती पॉझिटिव्ह व किती निगेटिव्ह आल्या याची माहिती आणण्यास सांगितले आहे. तसेच एचआरसीटी टेस्टमध्ये किती पेशन्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 

हॉस्पिटलने रेमडिसिव्हीर इंजेक्शन किती वापरले आणि ते कुठून घेतले याची माहिती मागितली आहे. तसेच औषध विक्रेत्यांनी रेमडिसिव्हीर इंजेक्शन किती दिलेत व कोणत्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर दिलेत, याची माहिती औषध विक्रेत्यांकडून मागवली आहे.

या केल्यात उपाययोजना

- विखे मेडिकल मध्ये १५० बेडच्या कोविड सेंटरला येत्या दोन दिवसात परवानगी दिली जाणार आहे. 

- किमान १ हजार कोविड रुग्णांना ट्रीटमेंट मिळेल अशी व्यवस्था केली जाणार आहे. 

- खासगी कोविड हॉस्पिटल योग्य बिल घेतायेत याच्या तपासणीसाठी समिती नेमण्यात आली आहे.

- रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या स्टॉक तपासणीसाठी आणि विना परवाना कोविड रुग्णांना ट्रीटमेंट देणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र तपासणी समिती नेमण्यात आली आहे. 

डॉक्टरांमुळेच रेमडिसिव्हीरचा काळाबाजार

कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना कोविड रुग्णांना ट्रीटमेंट दिली जात आहे. अशा डॉक्टरांमुळेच बाजारात रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा झाला आहे. या काळ्या बाजाराला डॉक्टरच जबाबदार आहेत, अशी माहिती आपल्या हॉस्पिटल तपासणीत समोर आली असल्याचे तहसीलदार अर्चना भाकड यांनी 'एमबीपी लाईव्ह24' चे मुख्य संपादक ऍड. उमेश अनपट यांच्याशी थेट संवाद साधून सांगितले. 

कायदेशीर कोविड रुग्णांना रेमडिसिव्हीरची ट्रीटमेंट दिली जात आहे. अशा डॉक्टरांमुळे शासकीय कोविड सेंटर आणि शासनाने परवानगी दिलेल्या खासगी कोविड सेंटर मधील अत्यवस्थ व गरजू रुग्णांना रेमडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होत नाही, ही खरी शोकांतिका असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !