दहावी बारावीच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर, आता होणार 'या' महिन्यात

मुंबई - राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे हित लक्षात घेऊन इयत्ता दहावी आणि बारावीच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 


आता १२ वीच्या परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर इयत्ता १० वीच्या परीक्षा जून महिन्यात घेण्यात येणार आहेत. याबाबतचे योग्य नियोजन करण्यात यावे, त्यादृष्टीने परिपूर्ण तयारी करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

राज्यातील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांच्या बदलाबाबत इतर परीक्षा मंडळांना अवगत केले जावे तसेच सुधारित नियोजनानुसार पुढील वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत जाहीर केले जावे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

बारावीच्या परीक्षा सुधारित कार्यक्रमानुसारच 

१२ वीच्या परीक्षा घोषित सुधारित कार्यक्रमानुसारच घेतल्या जाव्यात. हे करतांना १२ वीच्या विद्यार्थ्यांना पुढे आय.आय.टी, जेईई आणि नीटच्या परीक्षा देऊन इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचे असतात. हे लक्षात घ्यावे, त्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी अशा सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

तयारी पूर्ण करा, एसओपी तयार करा

आपण ज्या तारखांना १२ व्या परीक्षा जाहीर करू त्याच तारखांना घेता याव्यात यादृष्टीने व्यवस्था विकसित करण्यात यावी. केंद्रांची संख्या वाढवा, शाळा, इमारती निश्चित कराव्यात, मोठे हॉल शोधा, विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर (विरळ) बसवा, परीक्षा केंद्राची, प्रसाधनगृहांची स्वच्छता, त्यांचे निर्जंतुकीकरण याकडे लक्ष देण्यात यावे. आशा सूचना दिल्या आहेत.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !