मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता भाग्योदल फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (अमरावती) या बँकेचाही परवाना रद्द केला आहे. आरबीआय कडून मागील काही महिन्यांमध्ये अनेक बँकेचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
या बँकेचा परवाना पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्याच्या कारणामुळे तसेच सध्या जे ठेवीदार आहेत त्यांची परतफेड करण्यास बँक सक्षम नसल्याच्या कारणामुळे रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहे.सदर बँकेच्या बँकिंग व्यवसायावर 23 एप्रिलपासून बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, लिक्विडेशन झाल्यास प्रत्येक ठेवीदारास ठेवी विम्याच्या दाव्यांतर्गत 5-5 लाखांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. हे DICGC कायदा 1961 च्या तरतुदीनुसार शक्य आहे.