मुंबई - कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. महिनाअखेर राज्याला २ हजार टन ऑक्सिजनची गरज भासणार आहे. परंतु, सर्व प्रकल्पांतून सध्या उपलब्ध होणारे प्रमाण त्याहून कमी आहे. त्यामुळे अजूनही ही बाब चिंताजनक आहे.
राज्यात सध्या सगळीकडे मिळून १ हजार २५० टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. सध्याची रुग्णंची वाढती संख्या पाहता एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत रुग्णसंख्या ११ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे २ हजार टन दैनंदिन ऑक्सिजन लागणार आहे, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.
शेजारच्या राज्याकडून २५० टनांची गरज भागवली जाते. सध्या १,५०० टन ऑक्सिजनची राज्याची गरज आहे. तेवढाच पुरवठा होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची राज्याची गरज पुरी होत आहे. सध्याच्या परिस्थितीत शंभरपपैकी १५ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशात १५०० टन ऑक्सिजनची आवश्यकता होती. दुसऱ्या लाटेत मात्र ऑक्सिजनची गरज १५०० टण इतकी झाली आहे. केंद्र सरकार ५० हजार टन ऑक्सिजनची आयात करणार आहे. असेही मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले आहे.