अहमदनगर - शहरात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे दवाखानेच व्हेंटिलेटरवर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या खासगी रुग्णालयांत काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक आहे. कालपासून ही परिस्थिती उद्भवली आहे.
एका हॉस्पिटलने तर रुग्णांच्या नातेवाईकांना थेट कल्पना दिली. जिल्हा प्रशासनाने जिल्हा रुग्णालयातून तातडीने ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. नंतर इतर हॉस्पिटलनेही हीच मागणी केली. शहरातील दवाखान्यात चिंता वाढली आहे.
काही डॉक्टरांनी सामाजिक कार्यकर्त्यांना मदतीसाठी पाचारण केले. हिवरे बाजारचे उपसरंपच पोपटराव पवार यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे कळवत तातडीच्या मदतीची मागणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन
स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाने कार्यालयापुढे आंदोलन सुरु केले. स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सर्व कार्यकर्ते रस्त्यावर झोपून ऑक्सिजनची मागणी करत आहेत.
शहरातील काही लिक्विड ऑक्सीजन उत्पादक कंपन्या जिल्ह्याच्या बाहेर ऑक्सीजनची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रमुख पाच कंपन्यांना शहराबाहेर लिक्विड ऑक्सीजन विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
या कंपन्यांवर आता 'वोच
अहमदनगर इंडस्ट्रीयल गॅस (एमआयडीसी,)
हायटेक एअर प्राॅडक्ट्स (एमआयडीसी,)
श्रदधा एअर प्रॉडक्टस (एमआयडीसी,)
बालाजी एअर प्रॉडक्टस (ता. संगमनेर)
मुनोत गॅस एजन्सी (काष्टी, ता. श्रीगोंदा)