अहमदनगर - गुरुवारी कोरोना बाधितांच्या रूग्णसंख्येने आतापर्यंतचे सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल ३ हजारांहून अधिक कोविड बाधित रुग्ण सापडले आहेत.
गुरुवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ८७१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८२९ आणि अँटीजेन चाचणीत १ हजार ३९७ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी धक्कादायक आहे.
चोवीस तासांत ३५ मृत्यू - कोरोनामुळे बळी जाणार्यांचे प्रमाणही वाढले आहे. गेले चार दिवसांत ११९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी ३१, मंगळवारी २१, बुधवारी ३२, आणि गुरुवारी २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.