'टिका करणे सोपे आहे, पण उद्धव ठाकरे होणे अवघड'
मुंबई - एकीकडे राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रातून समोर येत आहेत. राज्यात कोरोना परिस्थिती अत्यंत विदारक झाली आहे. पण या परिस्थितीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका व्यक्तीचे कौतुक केले आहे.
ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत. ठाकरे यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व मुलगा तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. अशा व्दिधा परिस्थितीत मुख्यमंत्री राज्याचा गाडा हाकत आहेत.
एकीकडे राज्यातील परिस्थिती बिकट झालेली आहे. तर मुख्यमंत्र्याच्या घरातील दोन सदस्य कोरोनाशी लढात आहेत. तरीही मुख्यमंत्री म्हणून ते उत्तम जबाबदारी सांभाळत आहे. ते आपल्या कामात व्यस्त आहेत. तरीही कोरोना परिस्थिती योग्यरित्या हाताळू शकत नाहीत असे म्हणत त्यांच्यावर विरोधक तुटून पडले आहेत.
मुख्यमंत्र्यांवर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर भाष्य केले आहे. आव्हाडांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सलाम ठोकला आहे. तर टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. आव्हाड म्हणाले की, 'पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झुंजतोय. तरीही हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय.
जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत की, टीका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक ताणतणाव असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत..त्यास सलाम! सलाम!! सलाम!!!'