औरंगाबाद - नगर जिल्ह्यातून बँकेच्या परीक्षेसाठी औरंगाबादेत आलेल्या एका २३ वर्षीय युवकाचा मृतदेह महापालिकेच्या जवळ असलेल्या कब्रस्तानमध्ये सापडला आहे. या युवकाचा निर्घुणपणे खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
विकास देवीचंद चव्हाण (वय २३, रा.पाथर्डी, जि. अहमदनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो पाथर्डी तालुक्यातील हरीचा तांडा वस्तीवर राहणारा आहे. औरंगाबाद पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. ही माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहाय्यक आयुक्त हनुमंत भापकर, पोलीस निरीक्षक, अविनाश आघाव , संभाजी पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
बापरे ! हे तर भयंकरच
महापालिकेजवळ असलेल्या कब्रस्तानमध्ये हा प्रकार घडला. विकास चव्हाण याचा एक हात कोपरापासून तोडलेला असून तो गायब आहे, हा प्रकार अत्यंत भयंकर आहे.