वाचक मित्रांनो, गेल्या वीस वर्षांच्या बंधनांना झुगारून केलेल्या पत्रकारितेचा सर्वत्र आणखी मुक्तसंचार व्हावा म्हणून 'MBP Live24' चा महायज्ञ सुरू केलाय. अन्यायामुळे पीडित, दुःखित, कष्टात, हरलेल्या लोकांचे अश्रु पुसून त्यांना न्याय देण्यासाठी मांडलेला हा 'महायज्ञ' आहे. तो अविरत सुरूच राहील... अगदी शेवटच्या श्वासापर्यंत..!
धाबे दणाणले
शेवगाव शहरात एका रुग्णावर झालेल्या अन्यायाला आम्ही वाचा फोडली. त्यामुळे सेवारुपी आरोग्य सेवेचा 'बाजार' मांडणाऱ्याचे बिंग उघडे पडू लागल्याने सबधिताचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे या वैयक्तिक असणाऱ्या प्रकरणाला सामूहिक वळण देण्याचे काम सुरू आहे, हे विशेष. ही बाब इतरांनी समजून उमजून लक्षात घ्यायला हवी.
स्वतःच्या गुन्ह्यावर पडदा घालण्यासाठी इतरांना मोहरे बनवले जात आहे. मात्र, भूलथापांना बळी पडण्यापेक्षा प्रत्येकाने 'कुप्रवृत्ती'चा हा डाव, कुभांड सजगतेने ओळखून आपली स्वतःची काळजी घ्यावी. अन्यथा दुसऱ्याच्या पापाचे तुम्ही धनी व्हाल आणि कायद्याच्या कचाट्यात अडकून होरपळून जाल.
दबाव, धमक्यांची तमा न फिकीर...
बातम्या थांबविण्यासाठी दबाव आणला जातोय. अनेक लोकांच्या माध्यमातून थेट धमक्या दिल्या जात आहेत. पैशाचा, ताकदीचा माज दाखविला जात आहे. मात्र, बॉर्डरवर लढायला जाण्यास तैयार असणारा मी चिवट सैनिक आहे. मला मित्र, प्रशासन, सरकार, पत्रकारितेतील सहकारी आदी जे-जे लोक जवळून ओळखतात त्यांना माहीत आहे, की मी आजपर्यंत पत्रकारितेतील निर्भीड सैनिक म्हणूनच फिल्डवर राज्यात विविध ठिकाणी काम केलंय.
जो दुसऱ्या गावात, जिल्ह्यात, राज्यात प्राणपणाला लावून सत्याच्या प्रतिष्ठेसाठी लढलोय. आजपर्यंत सत्यासाठीच्या स्वतःच्या व सामाजिक सर्व लढाया मी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे जिकलोय. याचे अनेक साक्षीदार आहेत.
"सच परेशान हो सकता है, पराजित नाही"! त्यामुळे या धमक्यांना मी आपर्यंत कधी भीक घातली नाही आणि मरेपर्यंत घालणार नाही. जोपर्यंत श्वास आहे तो पर्यंत स्वतःवर, कायदा आणि पोलिसांवर ठाम विश्वास आहे.
'कृष्णकृत्ये' बाहेर पडण्याची भीती
म्हणूनच म्हणतो धमक्यांना घाबरणारी माझी लेखणी नाही. स्वतःची 'कृष्णकृत्ये' बाहेर पडू नयेत म्हणून माझी लेखणी थांबवू पाहणाऱ्यांना ती कधीच थांबवता येणार नाही. चुकीचे, असामाजिक घटक तिला जेव्हढा विरोध करतील तेव्हढ्याच जास्त स्पीडणे ती काम करेल, हा आजपर्यंतचा इतिहास आहे.
माझ्याकडे गमावण्यासारखे काही नाहीय. कारण मी 'एनसीसी'त असतानाच माझा जीव देशासाठी कधीच ओवाळून टाकलेला आहे. जो समोरून छातीवर येणाऱ्या दुष्मनाच्या गोळीला घाबरत नाही, त्याला पाठीमागून पाठीत वार करणाऱ्याची कसली आलीय तमा ?
हे लुंग्यापुग्याचे काम नव्हे !
इथे कोरोनाने लोकं मरत आहेत. मी तर सत्याच्या, सर्वसामान्य जनतेच्या हक्क, विजयासाठी मरणाला निधड्या छातीने कधीही कवटाळायला तयार आहे. त्यामुळे लुंग्यापुग्यानी धमक्या देऊन आपल्या गुन्ह्याच्या खात्यात वाढ करून घेऊ नये. कुठल्याही परिस्थितीत गोरखधंदा बाहेर आणणारच.
यात सहभागी असणार्याचेही बुरखे टराटरा फाडल्याशिवाय हे वैद्यकीय सेवेचा बाजार मांडणाऱ्याना कायद्यापुढे उभे करण्यासाठीचे 'मिशन'कदापिही थांबणार नाही. आजपर्यंत मी राबविलेले सर्व मिशन प्रामाणिक जिद्दीने, मेहनतीने फत्ते केलेत. हे रेकॉर्ड आहे. आतले बाहेरचे कोणाचीही तमा केलेली नाही.
निर्भीड निरीक्षण
कोणी कितीही खोटा आव आणला तरी सत्य कधीही लपत नाही. हे माझ्या 20 वर्षाच्या खडतर, चिवट, निर्भीड पत्रकारीतेमधील निरीक्षण आहे. जो गुन्हा करणार तो इथेच भरणार. कायदा मजबूत आहे. फक्त पुरावे आणि तुम्ही ठाम असायला हवे.
आणि येस, मी ठाम होतो, आहे आणि राहणार ! भरपूर पुरावे आहेत, चुकीच्या लोकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी. बाकी पुराव्यांपुढे 'मॅनेज सिस्टम' ला (स्वतःला वाचवण्यासाठी) न्याय देवाच लागेल. सत्य गंभीर आहे, ते समोर येईलच.
गंदा है, पर इनका धंदा है ये..!
अबकी जहाँ दिडी तो नामोनिशाण नही होंगा,
कश्मीर तो होंगा लेकिन पाकिस्तान नही होंगा..!
हाऊ इज द जोश... व्हेरी व्हेरी हाय सर... जय हिंद... !
- ऍड. उमेश अनपट,
मुख्य संपादक
एमबीपी लाईव्ह 24