आपलाच संवाद आपल्या मनाशी..

अंतर्मनात डोकावताना कधी शब्दाची जाणीव खुणावते.. रेघोट्या मारल्यासारखी...जिथं संवाद हा फक्त आपल्या मनाशी घडतो.. कित्तेक वेळा खोलवर मनात दडलेला एकांती स्वर आपल्या आता ओरडून ऐकवू पाहत असतो आपल्याला.. डोळे बंद करून हसू लागतो आपल्यावर...


नवल जणू नसतं हे काही.. विभागलेल्या मना तुझी अशी दुफळी होणारच हे बजावून सांगावं लागत कुणाच्या न कळत एकांतात... एक मात्र नक्की जेव्हा या गोष्टी घडतात तेव्हा नात्यांची वलय आपली भूमिका मात्र चोख बजावतात. ती खोटी खोटी असली तरी न्याय मात्र पूर्ण देतात आपल्या अस्तित्वाच्या भूमिकेला...

या ठिकाणी बाकी सगळ्या भूमिका, नाती, आपली हत्यारं खाली टाकतात, इच्छा नसली तरीही. कारण तिथं साळसुदपणाचा आव नाही आणता येत.. या मारलेला रेखोट्यावर कल्पनेन मात्र बागडायला सुरवात केलेली असते.. जी कधी खूप सुखावह असते.. जर ती अंतर्मनाची असेल तर ठीक, नाहीतर तीही काळासोबत बेचिराख ठरते..

एक मात्र नक्की शब्दांनी फोडलेला हंबरडा फोडतो टाहो नेहमीच.. काळजाचं पाणी होण्याआधीच अनोळखी डोळ्यात पाणी तरळतं... तेव्हा जाणवते शब्दांची ताकत न किंमत.. बाहुपाशात आलिंगन देणाऱ्या जीवाला कळतेच, किंबहुना एखादी जागा जोपत्या निर्मळ घडू पाहनाऱ्या प्रासंगिक घटनेत शबआपल्या तापमाच्या वजनाने  समरस होऊन वेळ सुदंरपणे निभावतात...

परंतु कधी अनाहूतपणे ते आपल्या न कळत रागरंगही बदलतात. कारण त्यांना या कलियुगात मनुष्य सारख्या सजीवासोबत बेमुदत मोघम संसार थाटायचा असतो. अविरत म्हणून कधी तरी शब्दाचा खटका उडतोच. प्रेमात मात्र क्षण-क्षण शब्द गारवाच देतात.. आणि आपलंसं करतात..

एवढंच काय पण या शब्दांमुळेच माझी भावना आपल्या नजरे समोर बागडतेय...

- आरती खोजे - दिवटे (औरंगाबाद)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !