जीवावर बेतणारे चुकीचे उपचार करून डॉ. विकाश बेंडके यांनी माझे शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान केल्याचा आरोप करून पीडित रुग्ण कुदुस बिबन पठाण यांनी शेवगाव शहरात एकच खळबळ उडवून दिली होती. आता याच डॉ. बेंडके यांच्या हॉस्पिटलला नियमांना धाब्यावर बसवून कोविड सेंटरची परवानगी दिल्याचा आरोप करत ही परवानगी देऊ नये, अशी मागणी थेट शेवगावच्या धडाकेबाज तहसीलदार अर्चना भाकड यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता आणखी वेगळे वळण लागले आहे.
शेवगाव - जीवावर बेतणारे चुकीचे उपचार केल्याबाबत पीडित रुग्णाने डॉ. विकाश बेंडके याच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल, तसेच दोषी असल्यास कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. आथार्व हॉस्पिटलचे संचालक डॉ. विकाश बेंडके यांच्यावरील चौकशीचा अहवाल प्राप्त होताच पुढील योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे तहसीलदार अर्चना भाकड यांनी 'MBP Live24' ला माहिती देताना सांगितले.
तहसीलदार यांनी दिला ईशारा
तहसीलदार भाकड म्हणाल्या, डॉ. बेंडके यांनी चुकीची व जीवावर बेतणारी ट्रीटमेंट दिल्याने शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान झाल्या प्रकरणी डॉ. बेंडके यांच्या विरोधातील तक्रार अर्ज मला प्राप्त झाला आहे. पीडित कुदुस बिबन पठाण यांच्या तक्रारीची सखोल चौकशी करण्याचे आदेश मी आरोग्य विभागाला तत्काळ देत आहे. तसेच आरोग्य विभागाकडून अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाहीसाठी संबंधित वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
काय केली आहे तक्रार
दरम्यान, न्याय मिळण्यास उशीर होत असल्याने आणि तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकून धमकाविण्याची भाषा केली जात असल्याने पीडित कुदुस पठाण यांनी आज थेट शेवंगावच्या तहसीलदार भाकड यांच्याकडे तक्रार अर्ज केला. यात, डॉ. बेंडके यांनी माझ्या जीवावर बेतणारी चुकीची व बेकायदेशीर ट्रीटमेंट देऊन माझे शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तसेच नियमांना धाब्यावर बसवून 'तडजोडी'तून ही परवानगी देण्यात आली असल्याचा आरोप पीडित पठाण यांनी केला आहे. तसेच या कोविड सेंटरला परवानगी देणारे नगरपरिषद आणि आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

तसेच डॉ. बेंडके यांच्या हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटरला नियमांना धाब्यावर बसवून परवानगी देण्यात आली असल्याचा आरोप करत ही परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच याठिकाणी भविष्यात कुठली दुर्घटना झाली अगर रुग्ण दगावल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला आहे. याशिवाय नियमांना डावलून परवानगी देणाऱ्यांना यासाठी जबाबदार धरावे, असेही म्हटले आहे.
संबंधितांवर कारवाई करा
संबंधितांवर कारवाई करा
तसेच नियमांना धाब्यावर बसवून 'तडजोडी'तून ही परवानगी देण्यात आली असल्याचा आरोप पीडित पठाण यांनी केला आहे. तसेच या कोविड सेंटरला परवानगी देणारे नगरपरिषद आणि आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
पुढील भागात अवश्य वाचा...
पुढील भाग 2
डॉ. बेंडकेच्या 'आथार्व' हॉस्पिटलने कुठले नियम बसविले धाब्यावर ?
पुढील भाग 3
डॉ. बेंडकेसाठी पठाण यांच्यावर दबाव टाकणारे व धमकी देणारे कोण ?