अहमदनगर - कोरोना रुग्णांकडून नियमापेक्षा जास्त बिले जर कोणी वसूल करत असेल, तर नातेवाईकांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे दवाखाने व लॅब्जवर गुन्हे दाखल करू, असा इशारा तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिला आहे.
कोरोनाबाधितांची संख्या राहाता तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभुमीवर तहसीलदार कुंदन हिरे यांनी काल शिर्डीतील अनेक हॉटेल, लॉजिंग, दवाखाने, लॅबमध्ये जाऊन तपासणी केली.गुन्हे दाखल करणार
तर होईल सक्त कारवाई
शासनाने ठरवून दिल्याप्रमाणेच बिलाची आकारणी करावी, खासगी दवाखान्यात रुग्णांकडून अधिक बिले आकरू नयेत, त्याचप्रमाणे खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी अतिरीक्त पैसे घेऊ नयेत, अन्यथा अशा खासगी दवाखाने किंवा लॅबवर सक्त कारवाई करण्यात येईल, असाही इशारा हिरे यांनी दिला आहे.
नियमांचे पालन करा
मास्क वापरा
पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये, तसेच लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर समारंभासाठी गर्दी करू नये. सर्व नागरिकांनी अटी व शर्तींची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल.