अहमदनगर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत डिसेंबर २०२० मधे सेट परिक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे सुपरवायजर विजय बोरुडे यांच्या पत्नी गितांजली विष्णु वाघ या उत्तीर्ण झाल्या आहेत.
गितांजली वाघ-बोरुडे (रा. घोडेगाव, ता. नेवासे) यांनी बारावीपर्यतचे शिक्षण कोपरगाव येथे घेतले. त्यानंतर त्यांनी डीएड मुंबईत पूर्ण केले. बी. ए. ला इंग्रजी स्पेशल विषय घेऊन त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या होत्या.
यानंतर अहमदनगर येथील न्यु आर्ट्स, काँमर्स अँण्ड सायन्स काँलेजमध्ये येथे बी.लीब तर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती येथे एम.लीब केले. यामध्येही दोन्ही महाविद्यालयात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
गीतांजली वाघ-बोरुडे यांनी गृहिणी म्हणून जबाबदारी सांभाळताना हे यश संपादन केले. त्यांना पती विजय बोरुडे यांनीही सतत साथ आणि प्रोत्साहन दिले. चिकाटीने व जिद्दीने मिळवलेल्या या यशाबद्दल घोडेगाव ग्रामस्थांचे वतीने त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.