पुणे - गेल्या दोन ते तीन वर्षांपासून फरारी, अनेक गुन्ह्यांमध्ये हवा असलेला कुख्यात गुन्हेगार बाळा दराडे याला नाशिकमध्ये बारामती पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मोका देखील लागू असलेला दराडे पोलिसांना अनेक दिवसांपासून हुलकावणी देत होता.
अनेक दिवसांपासून फरार असलेला दराडे पोलिसांच्या रडारवर होता. त्याची माहिती देणाऱ्यास ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी पन्नास हजारांचे बक्षीस देखील जाहीर केले होते.औद्योगिक वसाहतीमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न त्याने अनेकवेळा केला होता. तसेच शस्त्रास्त्र बाळगून दहशत माजवण्याचे गुन्हे त्याच्याविरोधात दाखल होते. त्याने युवकांच्या टोळ्या बनवल्या होत्या. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते.
परंतु अनेकदा त्याने पोलिसांना गुंगारा दिला. त्याला नातेवाईकही मदत करत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. अखेर त्याला नाशिक मधून बारामती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश ढवाण यांनी जेरबंद केले.