रेमडेसिवीरचा काळाबाजार ! 'या' दोघांना घेतले ताब्यात..

ठाणे - कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघा जणांना ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणांहून पोलिसांनी ताब्यात घेतले. रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यभरात तुटवडा जाणवत असल्याने मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे.


दोघे ताब्यात

ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली. तीन हात नाका येथील इंटरनिटी मॉल येथे सापळा लावून एका आरोपीस रंगेहात पकडले. त्याच्याकडून १६ इंजेक्शन ताब्यात घेण्यात आली आहेत, तर बाळकूम नाका येथून आणखी एकाला पाच इंजेक्शनसह ताब्यात घेण्यात आले.

५ ते १० हजाराला विक्री

आतिफ परोग अंजुम (वय २२, रा. कुर्ला, मुंबई) आणि प्रमोद ठाकूर (३१, रा. ठाकूरपाडा, भिवंडी) अशी आरोपींची नावे आहेत. ते एक इंजेक्शन ५ ते १० हजार रुपयांना विकत होते.

२१ इंजेक्शन ताब्यात

तीन हात नाका आणि बाळकूम येथे शनिवारी दोघे रेमडेसिवीरची इंजेक्शन घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी सापळा रचून दोघांना अटक केली आहे. त्या दोघांकडून पोलिसांनी २१ इंजेक्शन ताब्यात घेतल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाने दिली. 

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्यासह इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या कलमानुसार गुन्हा दाखल

आरोपींविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९९५ चे उल्लघंन, दंडनीय कलम ७ ( १) ( ए ) कलम १८-बी व, औषध प्रसाधन कायदा १९४० चे कलम १८ (सी) अन्वये गुन्हा नोंदविल्याची माहिती देण्यात आली.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !