दिलासा ! शेवगावला १०० बेड्सचे कोव्हीड केअर सेंटर, माजी आमदार घुले यांचा पुढाकार

शेवगाव - तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांचे तालुक्यातील प्रमाण वाढत आहे. यावर मात करण्यासाठी माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांनी आता पुढाकार घेतला आहे. शेवगाव येथे १०० बेडचे सोयीसुविधांनी युक्त सुसज्ज "कोव्हीड केअर सेंटर" सुरु होत आहे. येत्या दोन दिवसांत रुग्णांच्या सेवेकरिता हे सेंटर उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले यांनी 'MBP Live24'ला दिली आहे. 


सभापती क्षितीज घुले म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अनेक रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे उपचारांअभावी त्यांची हेळसांड होत आहे. ती थांबावी, त्यांना शेवगावमध्येच उपचार उपलब्ध व्हावेत, म्हणून 100 बेडचे सुसज्ज यंत्रणा असलेले कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. 

सामाजिक बांधिलकीतुन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. अदृश्य शक्तीशी सुरू असलेल्या या लढाईत सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे, असेही घुले यांनी सांगितले.

यांच्यावर होणार उपचार

कोरोना झालेल्या आठपेक्षा कमी स्कोर असणाऱ्या रुग्णांवर येथे उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी खासगी 5 डॉक्टर व काही नर्स यांची टीम उपलब्ध असणार आहे. तसेच त्यासाठी लागणारे प्राथमिक स्तरावरील औषधोपचार केले जातील. 

औषधोपचार, जेवण मोफत

या सेंटरमध्ये येणाऱ्या रुग्णांवर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. त्यासाठी डॉक्टर, नर्स, कॉट भाडे, औषधे आदी सुविधा पूर्णेपणे मोफत दिल्या जातील. कोरोना रुग्णांसाठी क्वारटाईन सेंटर असणाऱ्या या ठिकाणी उपचारासोबत जेवणाची मोफत व्यवस्था असणार आहे. ते जोपर्यंत येथे ऍडमिट असतील, तोपर्यंत त्यांना मोफत जेवण दिले जाईल.

या सुविधा उपलब्ध

- 100 बेडची व्यवस्था
- प्राथमिक औषधोपचार
- पाच डॉक्टर व नर्सची सुविधा
-ऑक्सिमीटर तपासणी
- ब्लडप्रेशर तपासणी
-गोळ्या-औषधे
-मोफत जेवण
- विविध वैद्यकीय उपकरणे 

नरेंद्र घुले यांनी घेतला आढावा

शहरातील लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालय येथे उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरच्या तयारीचा आढावा नरेंद्र घुले यांनी घेतला. या ठिकाणी जागा, कॉट, पाणी, वीज, पंखे आणि इतर सुविधा तयार आहेत. तेथेस्कोप, रक्तदाब मापक, ऑक्सिमीटर आदी वैद्यकीय उपकरणे येणे अद्याप बाकी आहे. ते मिळताच येत्या दोन दिवसात प्रत्यक्षात सेंटर सुरू होईल, अशी माहिती माजी आमदार नरेंद्र घुले यांनी दिली.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !