१ लाख नगरकरांची कोरोनावर यशस्वी मात ! पण..

अहमदनगर - जिल्ह्यात सध्या कोरानाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत देखील एक चांगली बातमी आली आहे. जिल्ह्यात कोरोना जितक्या वेगाने पसरत आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणात कोरानावर यशस्वीपणे मात करण्याचा आत्मविश्वास आणि खंबीरपणाही नगरकरांनी दाखवला आहे. पण...


शनिवारी १ हजार ९९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख २९० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२६ टक्के इतके झाले आहे. हे चांगले असले तरीही एक धोका कायम आहे.

धोका टळलेला नाहीएकीकडे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी कोरोनाबाधित होण्याचे प्रमाणही तितक्याच वेगाने वाढत आहे. शनिवारी जिल्हयाच्या कोरोना बाधित रूग्णसंख्येत २ हजार २१० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२ हजार ६१ इतकी झाली आहे.

शुक्रवारी सायंकाळी ते शनिवारी सायंकाळी चोवीस तासांच्या कालावधीत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९६०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४८४ आणि अँटीजेन चाचणीत ७६६ रुग्ण बाधीत आढळले आहेत.

शनिवारी इतक्या जणांना डिस्चार्ज

मनपा ४७६, अकोले २८, जामखेड ९४, कर्जत २५,  कोपरगाव २०२, नगर ग्रामीण ९३, नेवासा ५७, पारनेर ६५, पाथर्डी १४०, राहाता १९५, राहुरी ७९, संगमनेर १५४, शेवगाव ६९,  श्रीगोंदा ६९,  श्रीरामपूर १९३, कॅन्टोन्मेंट ३१, मिलिटरी हॉस्पिटल ५, इतर जिल्हा १९ आणि इतर राज्य २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या - १,००,२९०
उपचार सुरू असलेले रूग्ण - १२,०६१
आतापर्यंत एकूण मृत्यू - १,२८२
एकूण रूग्ण संख्या - १,१३,६३३
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !