ग्रेट ! आता 'या' वयोगटातील लोकांनाही मिळेल कोरोनाची लस

मुंबई - देशात ४५ वर्षांवरील नागरिकांचे गुरुवारपासून लसीकरण सुरू होणार आहे. केंद्र सरकारकडून राज्याला कोविशील्ड लसीचे गुरुवारी २६ लाख ७७ हजार डोस मिळणार आहेत. तरीही ३ कोटी लाभार्थींसाठी लसीची टंचाई भासणार आहे. त्यामुळे त्यासाठी नियोजन करावे लागणार आहे.

राज्यात ४५ वर्षांवरील लोकांची संख्या तब्बल ३ कोटी ६८ लाख इतकी आहे. यापैकी ५२ लाख ९६ हजार ४१३ लाभार्थींनी पहिला डोस घेतला आहे, तर ७ लाख ३३ हजार २३६ लाभार्थींचा दुसरा डोस झाला आहे. रोज सरासरी २ लाख लाभार्थींचे लसीकरण होत आहे. आतापर्यंत ६० लाख २९ हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेले नागरिकांचा समावेश आहे. ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू होत आहे. या वयोगटाची संख्या ३ कोटी ६८ लाख आहे. यापैकी ६० लाखांचे लसीकरण झाले असले तरी ३ कोटींचे लसीकरण होणे बाकी आहे. 

त्यासाठी केंद्राकडून २६ लाख ७७ हजार डोस मिळणार आहेत. रोज २ लाख डोस ही आतापर्यंतची सरासरी धरली तरी ही लस पुढील १० ते १३ दिवस पुरेल, असा अंदाज आहे. आता इतर उर्वरित लसीकरणासाठी लवकरात लवकर लसीचे डोस मिळवण्याचे लक्ष राज्य सरकारसमोर आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !