मुंबई : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता महाराष्ट्रातील बँकांच्या कामकाजात देखील बदल केला असून सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच बँकेचं काम चालणार आहे. हा निर्णय आजपासून (23 एप्रिल) लागू होणार आहे.
केवळ हीच सेवा देणार
देशातील अनेक राज्यांमध्ये बँकेच्या वेळेत बदला करण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात सर्व बँक बंद आणि सुरु होण्याच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. येथे सकाळी 10 पासून ते दुपारी 2 वाजेपर्यंतच बँक सुरु राहतील. तसेच या काळात बँकेमध्ये कमीत कमी सेवा दिली जाईल. यामध्ये चेक क्लियरिंग, सराकारी व्यवहार, ट्रान्झिन्स तसेच इतर तत्सम सेवांचा समावेश आहे.
50 टक्केच कर्मचारी
बँकेचे कामकाजाचे तास कमी करून कर्मचाऱ्यांसाठी 50 टक्के उपस्थिती ठेवली आहे. काही प्रमाणात वर्क फ्रॉम होमही केले जाणार आहे. बँकेचे हे आदेश 22 एप्रिल ते 15 मेपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती आहे.