मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करूनही रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याने मुंबई पोलिसांनी त्याविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवेसाठी खासगी वाहनांना आता रंगीत स्टीकर लावावे लागतील, त्याव्यतिरिक्त अन्य गाड्यांवर कारवाई केली जाईल.
असा असेल कलर कोड
डॉक्टर व आरोग्यसेवकासाठी लाल, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूच्या विक्रीच्या वाहनावर हिरवा आणि सरकारी व अन्य महत्त्वाच्या व्यक्तीच्या वाहनांवर पिवळ्या रंगाचे स्टीकर लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. वाहनाच्या पुढील व मागील बाजूला ६ इंच आकाराचे गोल स्टीकर लावायचे आहे. त्याव्यतिरिक्त अन्य वाहने आणि कलर कोडचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे दिला आहे.
याचीही होणार पडताळणी
मुबीत प्रमुख मार्ग व नाक्यावर शनिवारी रात्रीपासून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. गाड्यांमधील कर्मचारी अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत आहेत का? याची तपासणी करण्यात येणार आहे. पोलीस, महापालिका, पत्रकार, डॉक्टर, अशा प्रकारे पोस्टर लावून कोणी फायदा घेत आहे का, याचीही पडताळणी केली जाणार आहे.
यांना बसतोय फटका