मुंबई - कोविड-१९ चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. ते १ मे २०२१ च्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता यात काही फेरबदल करण्यात आले आहेत.
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ही माहिती दिली आहे. हे बदल दि. २० एप्रिल २०२१ संध्याकाळी ८ वाजेपासून १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत असणार आहेत.
सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांचे दुकान (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी सह), कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्याची दुकाने, पावसाच्या हंगामासाठी साहित्य (वैयक्तीक व संघटनात्मक) सकाळी ७ ते ११ पर्यंत उघडे राहतील.
या दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8 पर्यंत मुभा असेल, परंतु आवश्यक वाटल्यास स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये फेरबदल करू शकते.
स्थानिक आपत्ती व्यवस्थापन काही गोष्टींना व सेवांना, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संमती घेऊन आवश्यक सेवा म्हणून घोषित करू शकेल.