खुलेआम बेकायदेशीरपणे ऍलिओपॅथीची प्रॅक्टिस करत लोकांच्या जीवावर बेतणारे उपचार डॉ. बेडके करत असल्याचा आरोप करणारे मुंगी येथील पीडित कुदुस बिबन पठाण यांची व्यथा रविवारी 'MBP Live24'ने निर्भीडपणे मांडली होती. मात्र, दमबाजी व जिवितास धोका निर्माण झाल्याने तक्रारदाराने आज थेट पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्यामुळे आता याप्रकरणास गंभीर वळण लागले आहे.
शेवगाव - मला व माझ्या कुटूंबियांच्या जीवाला शहरातील अथर्व हॉस्पिटलचे संचालक आयुर्वेदिक डॉ. विकास बेडके यांच्यापासून धोका असल्याचा तक्रार अर्ज पीडित कुदुस बिबन पठाण यांनी आज (ता.6) दुपारी शेवगाव पोलीस ठाण्यात दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तक्रारीत डॉ. बेडके यांच्या विरोधात अतिशय गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
डॉ. बेडके यांनी "माझ्या जीवावर बेतणारे उपचार केल्याचा" आरोप करत लेखी तक्रारी द्वारे न्याय मिळविण्यासाठी पीडित रुग्ण कुदुस बिबन पठाण यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी ते थेट आरोग्यमंत्र्यापर्यंत दाद मागितली आहे.
वारंवार दाद मागूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे पठाण यांनी न्यायासाठी 'MBP Live24' कडे आपली व्यथा मांडली. त्यानुसार आम्ही रविवारी (ता. 4) या प्रकरणी वाचा फोडली.
माझ्यासह कुटुंबाला धोका
दरम्यान, शेवगाव पोलीस ठाण्यात पठाण यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे, की आरोग्य प्रशासनाकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून डॉ. विकास बेडके यांनी तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.
अनेक जण मला प्रत्यक्ष किंवा फोनवरून तक्रार मागे घेण्यासाठी सांगत आहेत. तू तक्रार मागे घे, डॉ. बेडके तुला पाहिजे ते देतील असे सांगत आहेत. मी तक्रार मागे घेत नसल्याने भविष्यात मला व माझ्या कुटूंबियांच्या जीवाला डॉ. बेडके यांच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो. या वाढत्या दबावामुळे मला व माझ्या कुटूंबाला मानसिक त्रास होत आहे.
भविष्यात मला व माझ्या कुटूंबाला कुठल्याही प्रकारचे शारीरिक नुकसान झाले अथवा जीवाला बरेवाईट झाल्यास याची सर्व जबाबदारी डॉ. विकास बेडके यांची राहील. माझ्यावर वाढणारा दबाव आणि भविष्यातील धोका लक्षात घेऊन पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पठाण यांनी पोलिसांकडे केली आहे.
पीडित पठाण यांनी आरोग्य प्रशासनास दिलेल्या चार पानी तक्रार अर्जात म्हटले आहे, की मी मोटारसायकल चालवीत आजारी असल्याने उपचारासाठी डॉ. बेडके यांच्या अथर्व हॉस्पिटलमध्ये गेलो. मात्र, गंभीर आजारी असल्याचे सांगून भीती दाखवत मला ऍडमिट करून घेतले.
काय आहे प्रकरण
यानंतर एक्सरे, स्कॅन,रक्त तपासनी आदी तपासण्या करून रोख सुमारे 12 हजार रुपये घेतले. तसेच 8 हजार रुपयांचे मेडिसिन आणण्यास सांगितले. मी स्वतः हॉस्पिटलमधील मेडिकलमधून ते घेऊन आलो. यानंतर तेथील कंपाउंडरने मला थेट आयसीयूत दाखल करत माझी ट्रीटमेंट सुरू केली.
डॉक्टर बेडके हे थेट दुसऱ्या दिवशी मला तपासायला आले. माझी चार दिवस ट्रीटमेंट चालू होती. दिवसातून एक वेळ डॉक्टर बेडके येऊन पहात. बाकी ट्रीटमेंट नर्स आणि कंपाउंडर हेच देत होते. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे माझी तब्येत खालावली आणि मी मृत्यूच्या दारात पोहचलो.
या परिस्थितीत तुम्ही बरे होताल असे सांगून डॉक्टर बील भरण्यासाठी मागे लागले होते. मी वाचत नाही असे वाटले होते. शेवटी आमदार ताईंना फोन केल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात सोय केली.
त्यानुसार मी अम्ब्युलन्सने अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात शिप्ट झालो. यावेळी माझी तब्येत खूपच खराब होती. मला धड बसताही येत नव्हते.
सिव्हील हॉस्पिटलमधील ट्रीटमेंटने मला लवकर फरक पडला. मी बरा झालो. मात्र, ही वेळ दुसऱ्या कुणावरही येऊ नये, म्हणून मला चुकीची ट्रिटमेंट देऊन मरणाच्या दारात पोहचविणाऱ्या डॉक्टरच्या विरोधात आवाज उठवत आहे.
दरम्यान, 'MBP LIVE 24'चे संपादक ऍड. उमेश अनपट यांच्यावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, दबावाची तमा न बाळगता आम्ही पीडित पठाण यांची बाजू खंबीरपणे मांडली आहे व पुढेही मांडत राहू. आमचा कायद्यावर व अहमदनगर पोलिस प्रशासनावर विश्वास आहे.
मी तक्रारीवर ठाम आहे. माझी आर्थिक लूट करून शारीरिक, मानसिक छळवणूक करून वैद्यकीय सेवेला पैशांसाठी काळिमा फासणाऱ्या डॉ. बेडके यांच्यावर कठोर कारवाई करावी. याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची ही बोगस व जीवघेणी प्रॅक्टिस तात्काळ थांबवावी. अशी माझी मागणी आहे.
सिव्हील हॉस्पिटलमधील ट्रीटमेंटने मला लवकर फरक पडला. मी बरा झालो. मात्र, ही वेळ दुसऱ्या कुणावरही येऊ नये, म्हणून मला चुकीची ट्रिटमेंट देऊन मरणाच्या दारात पोहचविणाऱ्या डॉक्टरच्या विरोधात आवाज उठवत आहे.
'एमबीपी लाईव्ह 24' वर देखील दबाव
तक्रार आणि उपोषणावर ठाम
अन्यथा मी माझ्या कुटूंबियांसह शेवगाव तहसील कार्यालया समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा पठाण यांनी आज पुन्हा दिला आहे. तसेच त्यामुळे माझ्या व कुटूंबाच्या होणाऱ्या नुकसानिस संबंधित डॉक्टर आणि शासन जबाबदार राहील, असा निर्धार त्यांनी आज व्यक्त केला.
"आपल्या तक्रारी संदर्भात जिल्हा शल्चिकित्सक यांचेशी चर्चा झालेली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक त्यासंदर्भात चौकशीसाठी जिल्हास्तरीय कमिटी पाठवणार आहेत", अशी माहिती डॉ. काटे यांनी पीडित पठाण यांना रविवारी तात्काळ व्हाट्सएपच्या माध्यमातून कळविले. ही कमिटी कधी येणार आणि सखोल चौकशी करून पुढील योग्य ती कारवाई कधी करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हास्तरीय कमिटी चौकशी करणार