नागपूर : नागपुरातील कोविड रुग्णालामध्ये लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. नागपुरातील रुग्णालयात शुक्रवारी रात्री अचानक आग लागली. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला केला आहे.
काही लोक जखमी
शहरातील वाडी परिसरातील खासगी रुग्णालयाच्या दुसर्या मजल्यावर लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत काही लोक जखमी झाल्याचेही एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
27 रुग्णांना हलविले
या रुग्णालयातून सुमारे 27 रुग्णांना दुसर्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. यावेळी काही सांगता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आगीनंतर रुग्णालय खाली करण्या येत आहे.
हॉस्पिटलकडून बांधकाम आणि सुरक्षेच्या नियमांना फाटा
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई, नागपूर, अहमदाबाद, राजकोट आदी ठिकाणी खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये आग लागण्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. या मध्ये अनेकांना जीव गमवावा लागला.
या घटनामागील दोष शोधण्याची गरज आहे. 2003 मध्ये कोलकाता येथे हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत अनेकांना जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर असे लक्षात आले की बांधकाम नियमांचे पालन या हॉस्पिटलने केले नव्हते.
त्यावेळी सर्वोच न्यायालयाने हॉस्पिटलने बांधकामाचे नियम पाळणे बंधनकारक असल्याचे सांगून आणखी दुरुस्त नियमावली बनविण्यास सांगितले होते. मात्र, हे बांधकाम नियम आणि सुरक्षा संदर्भातील नियमांचे उल्लंघन सर्रासपणे बहुतेक हॉस्पिटल करताना दिसत आहेत.
नगररचना विभागाकडून याची सखोल पहाणी होणे गरजेचे आहे. म्हणजे अशा घटना वारंवार घडणार नाहीत. तसेच इतर शहरांमध्येही या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी आणि योग्य ती काळजी घेण्याची नितांत गरज आहे.