आयुर्वेदिक 'बेडका'ची ऍलिओपॅथीक 'उडी'

'बेडका'साठी तो 'ज्या' डबक्यात राहतो तेच जग असते, असं म्हणतात. त्यामुळे त्याची बुद्धीही तेव्हढीच संकुचित आणि अर्धवट असते. अशाच एका विराण छोट्याशा गावात, जिथे 'विकास' म्हणजे काय रे भाऊ? असे म्हणण्याची वेळ.. 'डेव्हलपमेंट' पासून कोसो दूर राहिलेल्या गावात, जिथे पिण्याचे पाणी मिळणेही मुश्किल.. अशा 'शेव'वाडीतील खालच्या आळीतील डबक्यात राहायला एक 'बेडूक' आला. बाहेर गावाहून येथे घुसखोरी करून तो 'जडीबुटी' (झाडपाल्याची आयुर्वेदिक औषधी) द्यायचा. लोक त्याला 'आयुर्वेदिक बेडूक' म्हणायचे. 


गजराजांच्या आश्रयाला बेडूक

मात्र, या बेडकास त्या वाडीत फारसे कोणी ओळखत नव्हते त्यामुळे भावही देत नव्हते. ज्या खालच्या आळीत हा बेडूक आला त्या आळीत एक 'गजराज' होते. ते वाडीतील लहानथोरांना 'आधुनिक' औषधी देत. वाडीत या गजराजांचा मोठा दबदबा होता. 

या बेडकाने हे हेरलं आणि गजराजांशी जवळीक वाढवली. त्यांच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून हे बेडूक वाडीभर जायला लागलं. वाढणारी ओळख पाहून बेडकाने हळूच एक पिल्लू सोडलं, की 'मी एक निष्णात तज्ञ आहे' आणि गुपचूप ऍलिओपॅथीची कास धरली. ही अफवा त्याने हळूहळू पसरवायला सुरुवात केली.

 'वाघा'शी आणि चतुर 'कोल्ह्या'शी जवळीक

दरम्यान, त्याने एका 'वाघा'शी आणि चतुर 'कोल्ह्या'शी जवळीक वाढवली आणि त्यांच्या बरोबर वेगळा व्यवसाय थाटला. चतुर कोल्ह्याने अनेक आयडीयाच्या कल्पना लढविल्या. या दोघामुळे तो व्यवसाय चांगला बहरु लागला. तसेच खालच्या आळीतील त्याचा 'धंदा' 'गजराजां'च्या ताकदीच्या जोरावर वरच्या आळीत आला. 

धूर्त बेडकाने 'दोन्ही डगरी'वर हात ठेवून पुढे मोठा डिग्री बहाद्दर असल्याची बतावणी चालूच ठेवली. या बतावणीस 'शेव'वाडी आणि पंचक्रोशीतील जनता भुलत गेली आणि वरच्या अळीचा धंदा वाढला, तसं या स्वार्थी बेडकाने आपले जोडीदार वाघ आणि कोल्ह्याला हळूहळू दूर केलं. 

गजराजांची 'आयडिया' आणि 'डेअरिंग' तथा पैशांच्या सपोर्टवर धूर्त बेडकाचा धंदा वाढत गेला. पुढे असाच काही काळ लोटत गेला. तशी बेकडला धंद्याची 'ही' जागा देखील कमी पडायला लागली. मात्र, गजराजांनी निःस्वार्थपणे त्या बेडकाची साथ दिली. 

नव्या जागेत जुनाच धंदा

बेडकाने आणखी आर्थिक ताकद मागितली. निःस्वार्थ गजराजांनी जवळचं बरंच काही गहाण ठेऊन, कर्ज काढून मोठी जागा घेऊन दिली. त्यावर मोठं गोडाऊन बांधण्यासाठी देखील मदत केली. 

मात्र, दिलदार गजराजास या चिंधीचोर बेडकाची धूर्त नीती समजलीच नाही. नव्या ठिकाणी या बेडकाने काही तरी कारणे देत गजराजांकडून पैसे उकळणे चालूच ठेवले. गजराज मात्र मोठया दिलाने आपली झोळी रीती करत राहिले.

मात्र, नव्या आणि मोठ्या जागेत या धूर्त बेडकाने काळाबाजाराचा नवीन प्लॅन आखला होता. यामध्ये विश्वासाने अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला आणि थेट जीवाला हात घालण्याची काळी तरतूद होती. ही समजताच गजराजांनी या 'कु'कृत्यात सामील होण्यास नकार दिला.

'बब्बर शेर'ची एन्ट्री

बिनलाज्या बेडकाने आणखी पैशांची मागणी करत गजराजाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आता मात्र गजराजांचा सय्यम ढळला. त्यांनी ही सर्व हकीकत आपल्या थोरले बंधू 'बब्बर शेर' यांना सांगितली. 

तोपर्यंत 'बब्बर शेर' आपल्या भावाच्या या लुटीच्या प्रकारापासून अनभीज्ञ होते. कारण ते बेडकासह त्यांच्या कुटूंबाला अगदी जवळचं मानीत. निःस्वार्थपणे आपले आयुष्य देश सेवेत घालणाऱ्या 'बब्बर शेर'चा राज्यभरातील 'कुप्रव्रुत्ती'मध्ये चांगलाच दरारा. 

धूर्त बेडकाने आपल्या व कुटुंबावर आलेल्या अनेक संकटात 'बब्बर शेर'ची मदत घेऊन ती संकटे पळून लावली होती. मात्र, याची जाण बेडकास व त्यांच्या कुटुंबास राहिली नव्हती.

रंग बदलणारा सरडा

धूर्त बेडकाचा एक रंग बदलणारा सरडा भाऊ होता. हा एक विषारी वृत्तीचा सरडा धुर्तपणात बेडकाचाही बाप होता. सरडा आणि बेडकानेच आजपर्यंतचा सर्व कुटील डाव मांडलेला होता. पण सरडा मागे रहात असे. 

सरडा आणि बेडकाच्या चेहऱ्यावरील भोळेपणाचा नकाब फाडून त्यांचे लाळघोटे चेहरे 'बब्बर शेर'ने सर्वांसमोर आणले. आपले रंग बदलून सरडा 'बब्बर शेर'चा सामना करू पहात होता. मात्र, 'बब्बर शेर'ने या सरड्याला एक झटक्यात या लुटारू 'बंटी-बबली'चा डाव उधळून लावला. 

शेवटी बेडकाला सरड्यासह आपल्या कुटुंबाला घेऊन शेववाडीतील पंचासमोर चावडीत सगळ्या देखत नाक घासत माफी मागावी लागली. बेडकाची मोठी नामुष्की झाली. धूर्त बेडकाचा लबाड चेहरा शेववाडी समोर आला. वाडीसह पंचक्रोशीत छि-थू झाली.

... आणि बंडूक ओक्साबोक्शी रडला

निर्मळ मनाच्या गजराजाला दगा दिला आणि त्याच क्षणी बेडकाच्या मागे शुक्ल काष्ठ लागले. नियतीने न्याय करण्यास सुरुवात केली. यावेळी सरड्याची बायको देखील बेडकाला शिव्या-शाप देत होती. याचवेळी बेडकाचे बाळ देखील गुदमरत होते. त्यामुळे हा बेडूक तडफडू लागला. 

ज्या गजराजाच्या खांद्यावर विश्वासाने डोके ठेऊन संकटाना तोंड द्यायचा त्याची आठवण बेडकाला झाली. न राहून त्याने गजराजाला आणि बब्बर शेर कडे हात पसरले. या परिस्थितीत देखील हे दोघे धाऊन गेले. बंद कॅबिन मध्ये बेडूक यांच्या खांद्यावर डोके ठेऊन ओक्साबोक्शी रडला. 

दुःखातून हलका झाला. पुन्हा चूक झाली म्हणून माफी मागितली. कॅबिनच्या बाहेर असणारे बेडकाची कुत्री हे सगळं गुपचूप बंद दाराआडून पहात, ऐकत होती. हा सर्व प्रकार पाहून ते हादरून गेले. गजराज आणि बब्बर शेर ने धूर्त बेडकाला माफ केले आणि ते निघून गेले.

नाशकंदा नगरीतील किल्ला

नाशकंदा नगरीत गजराज आणि बब्बर शेरने आपल्या आई-वडिलांची पुण्याई, प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर आपला अभेद्य किल्ला रुपी साम्राज्य उभं केलंय. नेहमी प्रामाणिकपणे जगणारे, दुसऱ्याची अडचण, दुःख आपली मानणारे हे कुटूंब आजही घट्टपणे एकत्र अगदी सुखाने नांदत आहे.

एकाकी बेडूक

याउलट धुर्तपणाने बेकायदेशीर 'ऍलिओपॅथी' वापरून लोकांच्या जीवाशी खेळून पोकळ  डोलारा उभा करणारा धूर्त, कपटी, चेहऱ्यावर भोळेपणाचा आव आणणारा बेडूक मनातून एकाकी पडलाय. कुटूंबाची वाताहत झालीय. चार दिशेला चारजण भटकत आहेत. सुख औषधालाही शिल्लक राहिले नाही. सर्वजण रोज तिळतीळ मरत आहेत.

ऍलिओपॅथीक उडी बेतली लोकांच्या जीवावर

मात्र बेडकाचा धुर्तपणा सुरूच आहे. तो थांबायला तयार नाही. आयुर्वेदिक बेडकाने डबक्यातून मारलेली ऍलिओपॅथीक उडी आता त्याला गुन्हेगारीच्या तळ्यात नेऊन बसवेल अशी परिस्थिती झाली आहे. एका 'परदेशी' पंडितांच्या मदतीने घेतलेली ही उडी अनेकांच्या जीवावर बेतत आहे. कळत न कळत हा परदेशी पंडित बेडकाच्या पापांचा भागीदार बनत चाललाय.  

तीच दहशत आणि तोच दरारा

बेडकाची उडी ज्यांच्यावर बेतली त्यांना प्रशासन, सरकार कोणी वाली राहिलेले नसताना ही पीडित मंडळी आपली याचना घेऊन थेट पोहोचली नाशकंदा नगरीत बब्बर शेरच्या दरबारात. डबडब त्या डोळ्यांनी त्यांनी आपली कैफियत मांडली आणि 'बब्बर शेर'चा सत्यासाठीचा लढा सुरू झाला. 

हा लढा न्यायासाठी बब्बर शेरच्याच दरबारात यावा हा नियतीचाच खेळ. मात्र, अनेकांच्या न्याय्य हक्कासाठी आजपर्यत जीवाची बाजी लावलेला बब्बर शेर पुन्हा शेववाडीच्या मैदानात उतरलाय 'तीच दहशत आणि तोच दरारा' घेऊन.

साठा उत्तराची ही कहाणी, सकल संपन्न..!

(या गोष्टीतील ठिकाण, घटना अथवा पात्र याच्या नावाचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. मात्र, ही गोष्ट खरी घडलीय तुमच्या आजूबाजूला... असे समजून वाचा म्हणजे सत्या ची ओळख होईल अगदी तंतोतंत..! )


या गोष्टीचा पुढील दुसरा भाग लवकरच... तोपर्यंत,

गोष्ट कशी वाटली हे आवर्जून सांगा 9270251878 या क्रमांकावर व्हाट्सएप, मेसेज किंवा थेट फोन करून.

-ऍड. उमेश अनपट
  ( मुख्य संपादक )
एमबीपी लाईव्ह 24
     नाशिक.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !