पिंपरी-चिंचवड : मोशी (पिंपरी-चिंचवड, पुणे) येथील 'ड्रीमव्हिजन फॉर यू ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड' या नेटवर्क मार्केटींग कंपनीने राज्यातील हजारो गुतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चारही आरोपींना आज (ता. 26) न्यायालयाने 3 मे पर्यंत पुन्हा तब्बल सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी 'MBP LIVE 24' ला दिली.
त्या चौघांना पुन्हा पोलीस कोठडी
दरम्यान, अटकेत असलेले 'ड्रीमव्हिजन' कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट नवनाथ मगर, सीईओ अमितकुमार पोंदे, कॅशीअर नितीन कुरकुटे आणि प्रतिनिधी विनायक शिरोळे या चौघांना आज दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 3 मे पर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे या चारही आरोपींचा पोलीस कोठडीतील मुक्काम आणखी सात दिवसांनी वाढला आहे. कृष्ण प्रकाश यांनी स्वतः घातलेय लक्ष
पिंपरी-चिंचवड चे डॅशिंग पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत तपासाची चक्रे फिरवून चौघा जणांना ताब्यात घेतलेले होते. त्यावेळी न्यायालयाने चौघांना ही पाच दिवसांची (26 एप्रिल पर्यत) पोलीस कोठडी सुनावली होती. या प्रकरणामुळे 'ड्रीमव्हिजन' कंपनीकडून फसवणूक झालेल्या हजारो गुंतवणूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
'ते' सहा आरोपी कोण?
बीड जिल्ह्यातील प्रचंड दादासाहेब भुसारे (वय 42, रा. डोणगाव, ता. केज) यांनी भोसरी (पिंपरी-चिंचवड, पुणे) मधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात 20 एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादी नुसार 420, 406, 34 व महाराष्ट्र ठेवीदारांचे रक्षण करण्याबाबत अधिनियम 1999 चे कलम 3, 43 नुसार आरोपी 'ड्रीम व्हिजन' कंपनीचे सिएमडी दिनेश कुरकुटे, दीपिका कुरकुटे, व्हाईस प्रेसिडेंट नवनाथ मगर, सीईओ अमितकुमार पोंदे, कॅशीअर नितीन कुरकुटे, लीडर विनायक शिरोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश कुरकुटे व दीपिका कुरकुटे अद्याप फरार
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आणि तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ए. के. पुजारी यांनी तपासाची चक्रे फिरून दोन दिवसात व्हाईस प्रेसिडेंट नवनाथ मगर, सीईओ अमितकुमार पोंदे, कॅशीअर नितीन कुरकुटे, लीडर विनायक शिरोळे या चौघांना 22 एप्रिल रोजी अटक केली. न्यायालयाने चौघांनाही 26 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आरोपी दिनेश कुरकुटे व दीपिका कुरकुटे हे दांपत्य अद्याप फरार आहे.
राज्यातील फसवणूक झालेल्या गुतवणूकदारांनी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा
सदर आरोपींनी आता पर्यंत ५०, ५६,४५०/- रुपयेची फसवणुक केली असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले असुन राज्यातील इतर जिल्हयातील लोकांचीही फसवणुक केल्याचे समजते. तरी नागरीकाना आव्हाकरण्यात येते की 'ड्रीम व्हिजन 4 यु ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीने अशा प्रकारची ज्या नागरीकांची फसवणुक केली असेल त्या नागरिकांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा 1 चे पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांच्याशी ९८२३३०२०५० या मोबाईलवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण...
संचालक कुरकुटे दाम्पत्याने 16 नोव्हेंबर 2016 रोजी ड्रीमव्हिजन फॉर यू ट्रेड प्रा.लि. या नेटवर्क मार्केटिंग कंपनीची स्थापना केली. कुठल्याही प्रकारे कायदेशिर नसलेला 2 लाख भरा आणि तिपटीने परतावा मिळवा असा फसवा मनिसर्क्युलेशन प्लॅन काढून या जोडीने महाराष्ट्रासह जवळच्या गोवा, गुजरात, राजस्थान, कर्नाटक आदी राज्यांमधील हजारो गुतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. तसेच राज्यातील पुणे, मुबई, नाशिक, अहमदनगर, बीड, परभणी, सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, नागपूर, अकोला, सोलापूर आदी जिल्ह्यातील हजारो लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.