काही तासांतच छडा ! पत्रकार रोहिदास दातिर हत्येप्रकरणी 'याला' घेतले ताब्यात

अहमदनगर - पत्रकार रोहिदास राधूजी दातिर यांच्या हत्येप्रकरणी काही तासांच्या आत एकास ताब्यात घेऊन अहमदनगर पोलिसांनी पुन्हा एकदा आपली चुणूक दाखवुन दिली आहे.


राहुरी येथील पत्रकार दातिर यांची अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी लाल्या उर्फ अर्जुन माळी यास पोलिसांनी अटक केली असून अन्य तिघे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

झाले होते अपहरण

पत्रकार दातीर यांचे दि. 6 एप्रिल रोजी भरदुपारी अपहरण करण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, दिवसभर त्यांचा काहीही तपास लागला नाही.

इथे सापडला मृतदेह

राहुरी शहरातील कॉलेज रोडला असलेल्या रोटरी ब्लड बँक जवळील रामदास पोपळघट यांच्या मालकीच्या मोकळ्या प्लॉटमध्ये रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला.

तिघांची चौकशी

त्यामुळे अपहरण करण्यात आलेले रोहिदास दातीर यांचे अज्ञात लोकांनी दातीर यांना बेदम मारहाण करून त्यांचा निघृणपणे खून केल्याचे उघड झाले. यानंतर तत्काळ तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी तिघांची चौकशी करून त्यांना सोडून दिले.

तिघे फरार 

मात्र, काही तास मध्येच लाल्या उर्फ अर्जुन माळी याला पकडले आहे. याप्रकरणातील अन्य आरोपी कान्हू मोरे, अक्षय मोरे, लाल तौफिक शेख अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

उरलेले तीन आरोपी पकडल्यानंतर हत्या कशासाठी करण्यात आली याचा उलगडा होणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !