खळबळजनक ! माझ्या जीवाशी खेळणाऱ्या डॉ. बेडके यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अन्यथा...

प्रत्यक्षात वैद्यकीय क्षेत्रातील आयुर्वेदिक शाखेचे शिक्षण घेऊन 'एमडी' असल्याची जाहिरात करत बेकायदेशीरपणे ऍलिओपॅथीची प्रॅक्टिस करनाऱ्या आणि लोकांच्या जीवावर बेतणारे उपचार डॉ. बेडके करत आहे, असा आरोप पीडित पठाण यांनी लेखी तक्रारीद्वारे केल्याने शेवगाव शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

शेवगाव :  शेवगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अथर्व हॉस्पिटलचे संचालक डॉ. बेडके यांनी "माझ्या जीवावर बेतणारे उपचार केल्याचा" आरोप करत लेखी तक्रारी द्वारे न्याय मिळविण्यासाठी पीडित रुग्ण कुदुस बिबन पठाण यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. काटे ते थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे दाद मागितली आहे. वारंवार दाद मागूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे पठाण यांनी न्यायासाठी 'MBP Live24' कडे आपली व्यथा मांडली.

चार पानी तक्रार अर्ज

पीडित पठाण यांनी चार पानी तक्रार अर्जात म्हटले आहे, की मी मोटारसायकल चालवीत आजारी असल्याने उपचारासाठी डॉ. बेडके यांच्या अथर्व हॉस्पिटलमध्ये गेलो. मात्र, गंभीर आजारी असल्याचे सांगून भीती दाखवत मला ऍडमिट करून घेतले. यानंतर एक्सरे, स्कॅन,रक्त तपासनी आदी तपासण्या करून रोख सुमारे 12 हजार रुपये घेतले. तसेच 8 हजार रुपयांचे मेडिसिन आणण्यास सांगितले. 

मी स्वतः हॉस्पिटलमधील मेडिकलमधून ते घेऊन आलो.  यानंतर तेथील कंपाउंडरने मला थेट आयसीयूत दाखल करत माझी ट्रीटमेंट सुरू केली. डॉक्टर बेडके हे थेट दुसऱ्या दिवशी मला तपासायला आले.  माझी चार दिवस ट्रीटमेंट चालू होती. दिवसातून एक वेळ डॉक्टर बेडके येऊन पहात. 

बाकी ट्रीटमेंट नर्स आणि कंपाउंडर हेच देत होते. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे माझी तब्येत खालावली आणि मी मृत्यूच्या दारात पोहचलो. या परिस्थितीत तुम्ही बरे होताल असे सांगून डॉक्टर बील भरण्यासाठी मागे लागले होते. मी वाचत नाही असे वाटले होते.

आमदारांच्या मदतीने सिव्हिलमध्ये दाखल

शेवटी आमदार ताईंना फोन केल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात सोय केली. त्यानुसार मी अम्ब्युलन्सने अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात शिप्ट झालो. यावेळी माझी तब्येत खूपच खराब होती. मला धड बसताही येत नव्हते. 

सिव्हील हॉस्पिटलमधील ट्रीटमेंटने मला लवकर फरक पडला. मी बरा झालो. मात्र, ही वेळ दुसऱ्या कुणावरही येऊ नये, म्हणून मला चुकीची ट्रिटमेंट देऊन मरणाच्या दारात पोहचविणाऱ्या डॉक्टरच्या विरोधात आवाज उठवत आहे.

पठाण यांनी विचारला जाब

१. एमडी असल्याचे सांगून बीएएमएस डॉ. बेडके रुग्णाची खुलेआम फसवणूक कशी काय करू शकतात.

2. अथर्व हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर, नर्स हेच पेंशटला ऍडमिट करून घेऊन ट्रिटमेंट कशी देतात

3. आयुर्वेदिक डॉक्टर असताना ते ऍलिओपॅथी ची प्रॅक्टिस कशी देतात.

4. त्यांच्याच हॉस्पिटलमधील बेकायदेशीर सीएमएलटी धारकाची रक्त-लघवी तपासणी लॅब च्या रिपोर्टवर रुग्णांचे उपचार करून त्यांच्या जीवाशी कसेकाय खेळू शकतात

5. बीएएमएस असताना मला कोरोनासाठीचे महागडे इंजेक्शन कसे देऊ शकतात.

6. 1 लाख 25 हजार रुपये खर्चूनही मला मरणाच्या दारात कसे नेऊ शकतात. डॉ. विकास बेडके माझी आर्थिक लूट करून माझी मानसिक व शारीरिक छळवणूक कशी करू शकतात

7. जीएसटी नसलेली बिले देऊन सरकारची आणि माझी फसवणूक कशी करू शकतात.

आयुर्वेदिक डॉ. बेडके यांना कुणाचा वरदहस्त

स्वतःला एमडी म्हणवत खुलेआम लोकांची फसवणूक कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे. आयुर्वेदिक शिक्षण असताना ऍलिओपॅथी ची औषधे, इंजेक्शन देऊन रुग्णाच्या जीवाशी दिवसाढवळ्या सुरू असलेला खेळ शेवगाव शहर, जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांना कसा काय दिसत नाही. डॉ. बेडकेला कोणाचा वरदहस्त आहे, अशी चर्चा आता शहरात सुरू झाली आहे.

जमवली कोट्यवधींची माया

एमडी असल्याचे भासवून डॉ. बेडके यांनी काही दिवसातच लाखो, कोटी रुपयांची माया जमवली आहे. एका छोट्या जागेत ओपीडी सुरू करणाऱ्या डॉक्टरने शहराच्या मध्य भागी मोक्याच्या ठिकाणी 3 ते 4 कोटी रुपयांचे अद्ययावत हॉस्पिटल उभारले आहे. चारचाकी वाहने आहेत. 

त्यांच्याबरोबर डॉक्टरी व्यवसाय सुरू करणारे अनेक डॉक्टर अजूनही भाड्याच्याच जागेत आहेत. थोड्या कालावधीमध्ये ही कोट्यवधी रुपयांची माया जमवली कशी, अशी चर्चा लोकांमध्ये होताना दिसते.

कारवाई कधी होणार?

न्यायासाठी गेल्या दोन महिन्यांपासून पीडित पठाण प्रशासनाचे उंबरे झिजवत आहेत. मात्र, त्यांच्या व्यथेकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉ. बेडकेचे जवळचे असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, असा आरोप पठाण यांनी केला आहे. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टर विरुद्ध आरोग्य विभाग कधी कारवाई करणार, या प्रतीक्षेत पीडित पठाण आहे.

कुटूंबासमवेत उपोषणास बसणार

माझी आर्थिक लूट करून शारीरिक, मानसिक छळवणूक करून वैद्यकीय सेवेला पैशांसाठी काळिमा फासणाऱ्या डॉ. बेडके यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच परवानगी नसताना बेकायदेशीरपणे ऍलिओपॅथी औषधे देऊन चुकीचे उपचार करून रूग्णांच्या जीवाशी खेळत सरकारची देखील फसवणूक केली. 

याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याची ही बोगस व जीवघेणी प्रॅक्टिस तात्काळ थांबवावी. अशी माझी मागणी आहे. अन्यथा मी माझ्या कुटूंबियांसह शेवगाव तहसील कार्यालया समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच त्यामुळे माझ्या व  कुटूंबाच्या होणाऱ्या नुकसानिस संबंधित डॉक्टर आणि शासन जबाबदार राहील, असेही स्पष्ट केले आहे.

न्यायासाठी 'यांच्या'कडे घेतली धाव

पीडित पठाण यांनी आपली शारीरिक, मानसिक छळवणूक केली आणि सरकारची फसवणूक केली म्हणून पंचायत समिती मधील आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयातील तालुका वैद्यकीय अधिकारी,जिल्हा परिषदेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हाधिकारी, विभागीय आरोग्य संचालक, आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे याचना केली आहे. 

तसेच आर्थिक फसवणूक करून शारीरिक नुकसान पोहचविल्या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि नाशिक विभागीय पोलीस आयुक्त यांच्याकडे दाद मागून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी आज पुन्हा दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आरोग्य विभागाची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न 'MBP Live24'ने केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क करत आहोत मात्र याबाबत कुठलीही ठोस भूमिका स्पष्ट करण्यास ते टाळाटाळ करत आहेत.

मी माझे प्रयत्न केले : डॉ. बेडके 

या संदर्भात डॉ. विकास बेडके यांच्याशी 'MBP Live24' ने संपर्क साधला असता 'मी रिपोर्ट नुसार रुग्ण पठाण यांना ट्रीटमेंट दिली. त्यांचा स्कोअर 12 असल्याने आयसोलेशनमध्ये ठेवले.  तसेच त्यांना लवकर बरे वाटावे म्हणून प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र, त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्याची मागणी केल्याने त्यांना सिव्हिलमध्ये जाऊ दिले. मी पूर्ण नियमांना धरून प्रॅक्टिस करत आहे. बाकी आरोग्य विभाग योग्य तो निर्णय घेईल.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !