लसीकरणापासून वंचित प्राथमिक शिक्षकांनी केली 'ही' मागणी

शेवगाव : कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेल्या काळात जीवाचा धोका पत्करून विविध आघाड्यांवर सेवा बजावनारे जिल्हा परिषद शिक्षक कोरोना फ्रंटलाईन वर्कर लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनाही मोफत लसीकरणाचा लाभ द्यावा, अशी मागणी प्राथमिक शिक्षकांनी केली आहे.

तहसीलदार अर्चना पागिरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की १६ जानेवारी २०२१ पासून फ्रंटलाईन वर्कर म्हणून कोरोना संकट काळात सेवा बजावणाऱ्या कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर यांना केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शासकीय लसीकरण मोफत स्वरूपात सुरू झाले. 

कोरोना काळात २०२०-२१ मध्ये तालुका व जिल्हा सीमेवर, रेशन दुकानावर, विलगीकरण कक्षात, आयुर्वेद कॉलेज मधील कोरोना सेंटर, शेवगाव, त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल शेवगाव येथील कोरोना सेंटर आदी ठिकाणी शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी रात्रंदिवस जीव धोक्यात घालून सेवा बजावली. 

परंतु, कोरोना फ्रंटलाईन वर्कर लसीकरणापासून हे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक वंचित राहिले आहेत. विशेष म्हणजे ज्यांनी कोरोना संकट काळात सेवा बजावली नाही, असे लोक कोरोना लसीकरणाचे दुर्दैवाने लाभार्थी झाले आहेत.

कोरोना संकट काळात सेवा बजावणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मोफत लसीकरणाचा लाभ मिळावा. आरोग्य वा तहसील विभागाने लिंक भरण्यासासाठी वेबसाईट माहिती दिली नव्हती. ती लिंक त्वरित जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

निवेनदनावर शिक्षकनेते प्रकाश लबडे, राजू ढोले, गुरुकुलचे नेते बापूराव आले, राजन पाटील ढोले, शेवगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष रामकृष्ण काटे, रावसाहेब बोडखे, अस्मान सुपेकर, भारतीचे तालुकाध्यक्ष संदीप कातकडे, विठ्ठल मार्डे, गणपत दसपुते, बाळासाहेब वाधुंबरे, विष्णू वाघमारे, रेश्मा धस, मनीषा हरेल, सुंदर सोळंके, संजय भालेकर, स्वराज्य मंडळाचे तालुकाध्यक्ष अरुण पठाडे, मच्छिंद्र भापकर,  पालवे यांच्यासह प्राथमिक शिक्षकांच्या सह्या आहेत.


शिक्षकांच्या लसीकरणाबाबत लवकर निर्णय घेऊ : तहसीलदार

कोरोना योध्यांसाठीच्या लसीकरण मोहिमेतील लसीकरणाच्या चौकशीचे आदेश तहसीलदार अर्चना पागिरे यांनी दिले आहेत. तसेच फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या लसीकरणाबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देखील तहसीलदार पागिरे यांनी दिल्याची माहिती शिक्षकनेते प्रकाश लबडे व राजू ढोले यांनी दिली.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !