'झेडपी'च्या गुरुजींनी केली 'ही' कमाल

औरंगाबाद : कोरोना काळातील लॉकडाऊन हटल्यानंतर शहरातल्या शाळा ऑनलाईन का होईना सुरू झाल्या. मात्र ऑनलाईन शाळेचा पर्याय द्यायचा कसा या विवंचनेत ग्रामीण भागातील शाळा होत्या. औरंगाबादच्या जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांनी एकत्र येत आयडियाची कल्पना लढविली आणि या अडचणीवर उपाय शोधला.


ग्रामीण भागातल्या मुलांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे कसे द्यायचे, असा मोठा प्रश्न जिल्हा परिषद शाळांमधल्या गुरुजींसमोर होता. राज्यभरातले तब्बल 400 शिक्षक ऑनलाईन एकत्र आले. आणि त्यांनी जन्माला घातले एक आगळेवेगळे कमालीचे  'झेडपी लाईव्ह' नावाचे ऍप.


झेडपी लाईव्ह अॅपमध्ये १ ली ते १० वीचे सगळे धडे अपलोड केले आहेत. धडे शिकवणा-या शिक्षकांचे व्हिडिओही त्यात आहेत. मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी त्यात खास गंमत शाळाही आहे. गणित, मराठी, इंग्रजी अशा सगळ्या विषयांची पुस्तके, ऑडिओ बुक्स आणि व्हिडिओ त्यात आहेत

ग्रामीण भागातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठीच झेडपी शाळेतल्या शिक्षकांची ही सगळी धडपड असल्याचे गुरुजी सांगतात. 'झेडपी लाईव्ह'ची ही आयडिया पालकांनाही आवडलीय. अॅपमुळे  मुलांना अभ्यासाची गोडी लागत असल्याचे पालक सांगत आहेत. 

ऑनलाईन व्हिडिओंच्या माध्यमातून औरंगाबादच्या वरवंडी तांड्यावरची मुले थेट जर्मन भाषा शिकली. त्याचे व्हिडिओ या अॅपमध्ये अपलोड केल्याने इतर मुलांनाही आता परदेशी भाषांचे धडे मिळत आहेत.

सोलापूरच्या झेडपी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना ग्लोबल टिचर पुरस्काराने अलीकडेच गौरवण्यात आले. पण असे डिसले गुरुजी प्रत्येक झेडपीच्या शाळेत आहेत, हेच या झेडपी लाईव्ह अॅपमुळे  दिसले.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !