'मानवसेवा'मुळे सतीशची पुन्हा कुटुंबियांशी गाठभेट

अहमदनगर - मानसिक विकलांग मुलावर उपचार आणि पोटाची खळगी भरायची म्हणुन एक बाप मुलाला घेवून दोन वर्षांपूर्वी गाव सोडून निघाले. रेल्वे प्रवासात मुलगा सतीश हरवला. संपुर्ण रेल्वेत शोधले, शोधून सापडला नाही. पण तो मानवसेवा प्रकल्पात आल्यानंतर त्याला पुन्हा सुखरूप कुटुंबाच्या हवाली करण्यात आले.

वयाच्या १२ वर्षी सतीशच्या मनावर आघात झाला होता. पालकांनी ८ ऑगस्ट २०१९ रोजी औरंगाबाद रेल्वे पोलिस स्टेशन येथे सतीश हरवल्याची नोंद केली होती. मन हरवलेला सतीश अनवाणी पायाने अहमदनगरकडे चालतच आला. रस्त्यात मिळेल ते खाऊन चालतच थेट शहरात पोहचला. 

एकीकडे सगळं जग कोरोनाने हदरलेले असताना सतीश मात्र अहमदनगर जिल्हा रुग्णालय परिसरात कोपरा धरुन बसलेला होता. जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय समाजसेवा अधिक्षक सुरेश कदम सर यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना त्याना मानवसेवा प्रकल्पात देण्याची विनंती केली.

सतीशला ६ मे २०२० रोजी मानवसेवा प्रकल्पात आधार दिला. मानवसेवा प्रकल्पाच्या समुपदेशन, उपचारानंतर सतिश बोलू लागला. मानवसेवा प्रकल्पाचे स्वयंसेवक प्रसाद माळी यांनी सतिशचे समुपदेशन केले. सतिशने समुपदेशना दरम्यान फक्त शाळेचे नाव सांगितले. 

सरदार वल्लभाई पटेल विद्यालय रायगाव यावरुन इंटरनेटच्या मदतीने मुख्याध्यापक जाधव सर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळाला. जाधव यांनी धाड गावचा असल्याचे सांगितले. त्यांनी तेथील जि. प. शाळा मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर दिला. त्यांच्याशी संपर्क करताच सतिश हा बुलढाणा जिल्ह्यातील धाड या गावातील असल्याची खात्री झाली. 

सतिशचे वडील पंढरीनाथ जुमडे व भाऊ यांना कळताच २३ मार्च २०२१ रोजी मानवसेवा प्रकल्पात पोहचले. मानवसेवा प्रकल्पाच्या मायेच्या उपचाराने सतिशला त्याचे कुटुंब मिळाले. हरवलेला मुलगा दोन वर्षानंतर मिळताच वडील व भावाला अश्रू अनावर झाले. 

मानवसेवा स्वयंसेवकांनी सतिशला वडील व भाऊ यांच्या ताब्यात दिले. सतीशच्या उपचार व पुनर्वसनासाठी मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर, डॉ. सुरेश घोलप, संस्थेचे मार्गदर्शक संजय शिंगवी, शशिकांत चेंगेडे, अविनाश मुंडके, डॉ. प्रीतमकुमार बेदरकर, शारदा होशिंग, अतिक शेख, महेश पवार यांचे मार्गदर्शन मिळाले. 

मानवसेवा प्रकल्पाचे स्वयंसेवक राहुल साबळे, अजय दळवी, प्रसाद माळी, कृष्णा बर्डे, अशोक मदणे, सुशांत गायकवाड, स्वप्नील मधे, अनिता मदणे, सिराज शेख, अंबादास गुंजाळ, नितीन बर्डे, सोमनाथ बर्डे यांनी यासाठी परिश्रम घेतले.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !