आजचा दिवस जाईल. उद्यापासून पुन्हा तेच ना ?

आजचा दिवस आपण एखाद्या परीक्षा सारखा साजरा करतो. जसे परीक्षा पुरता एक दिवस अभ्यास करायचा, परीक्षा झाली की अभ्यास विसरून जायचा. तसेच हा दिवस साजरा होतो. आजच्या दिवसासाठी गुगल वरून वेगवेगळे संदेश, चित्र शोधायची आणि इम्प्रेस करण्यासाठी सोशल मीडियावर अपलोड करण्याची बस. झाला महिला दिन साजरा.  

आज सोशल मीडियावर सगळीकडे स्त्रीचा सन्मान केला जात आहे. चांगली गोष्ट आहे. मग रोज का तिचा अपमान केला जातो. एखादी महिला , रात्री खूप उशिरा ऑनलाईन दिसली की लगेच तिच्यावर संशय घेतला जातो. तिला 'चालू' समजले जाते, आणि ती नवऱ्या बरोबर सुखी नाही, असे समजले जाते. अरे पण का ? हेच दोन पर्याय आहेत का तिथे ऑनलाईन असण्याचे ?

उद्यापासून आहेस परत तिच्या नशिबी असलेले मेसेज टोंन्ट, अपमान आणि बलात्कार समाज चांगला करायचा आहे ना, आज तिचा सन्मान आपण करतोय ना ! मला सांगा किती जणांना, आपल्या आईचा, बहिणीचा, बायकोचा आवडता रंग माहिती आहे. किती जणांना त्याची आवडीची भाजी माहितीय. फारच कमी जणांना ही माहिती असेल..

आपल्यापैकी काही जण जेव्हा पहाटे उबदार  शालीत किंवा एसीमध्ये गाढ झोपेत असतो. त्यावेळी ती उठून सर्व कामे करीत असते. आपल्या चहा-नाश्ता, दुपारचा डबा, मुलांची आंघोळ, त्यांची शाळेची तयारी अशी बरीच कामे करत असते. नंतर दिवसभर आपले घर स्वच्छ व नीटनेटके ठेवण्यासाठी झटत असते. आपण आणि मुले संध्याकाळी घरी परत आलात की गरम चहा नाश्ता तयार करते.  

रात्री तुम्ही झोपल्यानंतर ती दमून बघून झोपायला जाते. मग ! कधी घेणार मोबाईल हातात कधी स्वतःसाठी जगणार. विरंगुळा म्हणून मग रात्री मोबाईल घेते. पण हे लक्षात कोण घेत, कोणी नाही. तिला वाईट ठरवून मोकळे. आज मुलीला सातच्या आत घरात यायला पाहिजे म्हणून बंधन घालता. पण मुलाला सातनंतर बाहेर कसे वागायचे, हे का शिकवीत नाही आपण ?

मुलीला संस्काराची लक्ष्मणरेषा पार करू नकोस म्हणून सांगतो. पण खरे सांगू ... एवढा महापराक्रमी रावण लक्ष्मणरेषा ओलांडू शकला नाही. आणि ती रेषा सीतेने लीलया ओलांडली. कारण लक्ष्मणरेषा पार करून कोणी, तिला त्रास देऊ नये म्हणून त्या वाईट प्रवृत्ती साठी आखलेली होती. सीतेसाठी नाही. पण आपण अजूनही सीतेलाच दोषी ठरवत आहोत. 

लक्ष्मणरेषा ओलांडली म्हणून सीतेने एखाद्या अग्नी परीक्षा दिली. आणि ती महान ठरले. आजची स्त्री, विविध रावणाचा हातून स्वतःला वाचवण्यासाठी , रोज अग्निपरीक्षा देत असते. मग तिला महान काय फक्त एकच दिवस समजायचे. नोकरी करणारी स्त्री नोकरी करून घर देखील सांभाळत असते. स्वतःचा पगारातून घराचा हप्ता भरत असते. पण घरावर हक्क नवऱ्याचा.
  
अरे ! घराची गोष्ट सोडा !! ज्या बाळाला तीन नऊ महिने आपल्या पोटात वाढविते. आपल्या रक्त मासा आणि तिच्या पालन पोषण करते आणि ते मूल जन्माला आल्यावर नव बापाचे लावते. स्वतःच्या मुलावर पण तिची हक्क नसावा.  हा सन्मान करतो तिचा फक्त बँकेतील आवडीप्रमाणे नऊ महिने पोटातील तिजोरीत सांभाळायचे. आणि एफडी मॅच्युअर्ड झाली की मालकाला परत करायची एवढेच त्याचे काम समजतो. आपण हा सन्मान तिचा. 

अरे हा तर फार मोठा अपमान आहे या कामावर मातृत्वाचा. पण कोण समजणार, कोण बदलणार, या चालीरीती कोणीही नाही. अगदी मी सुद्धा नाही. कारण मीही याच समाजाचा एक घटक आहे. समाजाविरुद्ध आणि माझ्या पुरुषार्था विरुद्ध जगण्याची मी परवानगी कशी देणार स्त्रीला. वडिलांना सांभाळतो म्हणून शब्बास की मुलाला आणि सासु-सासर्‍यांना पासून वेगळे राहिले तर दोष मात्र सुनेला. वाह रे न्याय !! 

आज महिला कुठे नाहीत जाहिरातीत आहेत, कॅलेंडरवर महिला आहेत, घरात स्त्री नसेल तर घराला घरपण येत ना. ही तिचा रोज सन्मान करा कारण 19 व्या शतकात सावित्रीबाई फुले यांनी जो त्रास सहन केला त्याचे फलित आजच्या स्त्रियांना मिळते आहे. त्या सावित्रीबाईच्या या लेखी आहेत म्हणून त्यांचा सन्मान करा. ती आज पुरुषांच्या बरोबरीने सर्व गोष्टी करत असते. 

आज मोठ्या मोठ्या कंपनीच्या बँकेचा सीईओ, एमडी या पदावर स्त्री आहेत. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या बाऊसन्सर क्षेत्रात सुद्धा स्त्रिया आपली छाप पाडत आहेत. पुरुषाच्या बरोबरीने सैन्यात किंवा पोलिस दलात स्त्रिया उत्तम कामगिरी बजावीत आहेत. म्हणून त्यांचा सन्मान करा.  

आज आपली महिला टीम क्रिकेट विश्वची अंतिम फेरी खेळण्यासाठी सज्ज आहे म्हणून त्यांचा सन्मान करा. भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि आता अर्थमंत्री सुद्धा एक स्त्रीच होती आणि आहे हे विसरू नका. आज सैन्यदलात लेफ्टनंट पदावर एक स्त्री आहे. म्हणून तिचा सन्मान करा. मुलांना संस्कारात चांगले बनवण्यात तिची मेहनत असते. स्वतःच्या आईवडिलांना बरोबर सासू-सासर्‍यांची पण सेवा करते म्हणून तिचा सन्मान करा.  

नोकरी करून ती सर्व नाती व्यवस्थित पण जपत असते, घरातील वर्थ वैकल्य पूजा, सणवार साजरे करत असते, तुम्ही कसेही असा, तुम्हीच तिला सात जन्म हवे असतात म्हणून वडाची पूजा तीच करते, तुमच्या उदंड आयुष्यसाठी तीच मंगळगौरी पूजन करत असते, म्हणून त्याचा सन्मान करा. 

जुगारी दारूडा बाहेरख्याली नवऱ्यावर तीच पांघरूण घालून असते म्हणून तिचा सन्मान करा, मुलांना शिकून चांगल्या मोठ्या पदावर विराजमान होण्यासाठी तयार करते ती शिक्षिका म्हणून तिचा सन्मान करा. स्वतःच्या फॉर्म बीघडेल याची पर्वा न करता बाळाला जन्म देऊन जग जिवंत ठेवणारी स्त्री म्हणून तिचा सन्मान सन्मान करा . 

स्त्रियावर बलात्कार करण्यात पुरुषार्थ नाही तर तिचा इज्जत करण्यात खरा पुरुषार्थ आहे. अशीच आमची आई असती असा काल तिचा सन्मान होणार या देशात. आज तिला पदोपदी अपमान होत असल्यामुळे मला सामोरे जावे लागत आहे. 

शिवाजी महाराजांना जन्म देणारी जिजाऊ, संभाजीराजांना दूध पाजणारी धाराऊ याही स्त्रियांमध्ये आहे, म्हणून त्यांचा सन्मान करा. प्रत्यक्ष राम, कृष्ण यासारख्या देवांना सुद्धा जन्म घेण्यासाठी एकच स्त्रीचा आधार घ्यावा लागला, म्हणून अशा स्त्रीचा सन्मान करा.
 
तिच्या सन्मान करण्यासाठी तिला मेसेज पाठवून लाळघोटेपणा करण्याची गरज नाही. तुमची कमेंटच्या शब्दातूनच तिला असं मन समजून घेतो आणि मिळतो तिच्यावर उपकार दाखवल्या सारखा तिचा सन्मान फक्त आज एक दिवस करू नका.  स्त्री ही फक्त एका दिवसाच्या सन्मानसाठी नाहीयेत. तर रोजच तिचा सन्मान व्हायला हवा.  

सन्मान करायला जमत नसेल तर कमीत कमी तिचा अपमान तरी करू नका. एवढीच विनंती म्हणून मला असे वाटते.  एका स्त्रीचे मन समजून घेऊन तिला तिचा योग्य मान ज्या दिवशी दिला जाईल तोच खरा महिला दिन असेल.  

- प्रवीण कदम (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !