व्हॉट्सऍपची कॉलिंगबाबत धमाकेदार गुडन्यूज

डेस्कटॉपवर वापरत असतानाही व्हीडिओ किंवा वॉईस कॉल करू शकणार


मुंबई : व्हॉट्सऍपने ग्राहकांसाठी एक खुशखबर आणली आहे. आता व्हॉट्सऍप तुम्ही डेस्कटॉपवर वापरत असतानाही व्हीडिओ किंवा वॉईस कॉल करू शकणार आहात. कामाच्या ठिकाणी किंवा कामानिमित्त डेस्कटॉपवर व्हॉट्सऍप वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तर हा खूप मोठा दिलासा आहे. याबाबत ट्विटरवरून व्हॉट्सअपने माहिती दिली आहे.

'व्हॉट्सऍप'ने ट्विट करून ग्राहकांना ही गुडन्यूज दिली आहे

कोविड आणि लॉकडाऊनमुळे व्हॉट्सऍपचं वॉईस आणि व्हीडिओ कॉलिंग वाढलंय. त्यामुळे आता कॉम्प्युटरवरूनही व्हॉट्सअॅपचं वॉईस आणि व्हीडिओ कॉलिंग सुरू झालं, तर गुगल मीट, झूम, मायक्रोसॉफ्ट ऑफीससारख्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. 

विंडोज आणि आयओएस या दोन्ही सिस्टिमवर व्हॉट्सऍप कॉलिंग करता येईल, असे सांगण्यात आले आहे. सध्याच्या घडीला तरी संगणकावरून व्हॉट्सऍपचा खाजगी वॉईस किंवा व्हीडिओ कॉल करता येणार आहे, ग्रूप कॉलिंग करता येणार नाही.

'प्रायव्हसी' सुरक्षित

या घोषणेसोबतच व्हॉट्सऍपने पुन्हा एकदा प्रायव्हसीच्या मुद्द्याला हात घातलाय. एका यूजरने दुसऱ्या यूजरला मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून केलेला कॉल किंवा मेसेज हा सुरक्षित असतो, तो इतर कुणालाही पाहता किंवा ऐकता येत नसल्याचं व्हॉट्सऍपने स्पष्ट केले आहे. 

लवकरच ग्रुप कॉलिंगही येणार

याशिवाय लवकरच व्हॉट्सऍप ग्रूप वॉईस आणि व्हीडिओ कॉलचे फिचर आणणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

संगणकावरून व्हॉट्सऍप वॉईस कॉल कसा करायचा?

यासाठी तुम्हाला तुमचा फोन कॉम्प्युटरला जोडावा लागेल, आणि चांगले इंटरनेट कनेक्शनही लागेल.

व्हॉट्सऍपला तुमच्या कॉम्प्युटरच्या मायक्रोफोनचा किंवा वेबकॅमचा अक्सेसही द्यावा लागेल.

ज्याच्यासोबत तुम्हाला बोलायचे आहे, त्याचे खाजगी संभाषण उघडून वॉईस कॉलचा ऑप्शन तुम्हाला निवडावा लागेल.

संगणकावरून व्हॉट्सऍप व्हिडीओ कॉल कसा करायचा?

ज्याच्यासोबत तुम्हाला बोलायचं आहे, त्याचं खाजगी संभाषण उघडावं लागेल.

त्यानंतर व्हीडिओ कॉलचा ऑप्शन तुम्ही निवडू शकता.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !