उन्हाळ्यात कलिंगड का खावं ?

उन्हाळ्यात कलिंगडाची मागणी प्रचंड वाढते. त्यामुळे पारंपारिक शेती सोडून हा शेतकर्यांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झालेला आहे. कलिंगडाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ते आपण जाणून घेऊया. 

  • वजन कमी करण्यासाठी - वजन कमी करण्यासाठी कलिंगडाचा डाएटमध्ये जरूर समावेश करावा. कलिंगडामध्ये कॅलरीज कमी असतात. मात्र अधिक काळापर्यंत पोट भरलेले ठेवण्यास मदत करतात. १०० ग्रॅम कलिंगडामध्ये केवळ ३० ग्रॅम कॅलरीज असतात. यात १ मिलिग्रॅम सोडियम, कार्बोहायड्रेट ८ ग्रॅम, फायबर ०.४ ग्रॅम, साखर ६ ग्रॅम, व्हिटामिन ए ११ टक्के, व्हिटामिन सी १३ टक्के, प्रोटीन ०.६ ग्रॅम असते. 
  • इम्युनिटी सिस्टीम मजबूत करण्यासाठी तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी - कलिंगडामध्ये व्हिटामिन सी आणि ए आढळते. या व्हिटामिन्समुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे.  डोके थंड राहण्यास मदत - कलिंगडाची प्रवृत्ती ही थंड असते. कलिंगड खाल्ल्याने केवळ पोटच नाही तर डोकेही थंड राहण्यास मदत होते. याच्या बिया वाटून डोक्यावर लावल्या डोकेदुखी बरी होते.  
  • उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास - ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास अशा व्यक्तींनी कलिंगड जरूर खावे. कलिंगडामध्ये कमी प्रमाणात सोडियम असते तसेच हे थंड असते.
  • कलिंगडामध्ये लायकोपिन असतं, याने त्वचेची चमक कायम राहते.
  • हृदयासंबंधी समस्या रोखण्यासाठी कलिंगड हे रामबाण उपाय आहे. कलिंगड कोलेस्टॉल लेव्हल कमी करतं. ज्यामुळे हृदयासंबंधी आजारांपासून सुटका होऊ शकते.
  • कलिंगडात व्हिटामिन ए असतं आणि  व्हिटामिन ए डोळ्यांसाठी चांगलं असतं.
  • कलिंगड खाल्ल्याने डोकं शांत राहतं आणि चिडचिड कमी होते.
  • कलिंगडाच्या बीयाही उपयोगी असतात. या बीयाचं पावडर करुन ते चेह-यावर लावल्यास त्वचा चमकदार होते. तसेच याचा लेप डोके दु:खीवर चांगला उपाय आहे. 
  • कलिंगडाचे नियमीत सेवन केल्यास पोटाचा त्रास कमी होतो. तसेच रक्ताची कमतरता असेल तर कलिंगडाचा रस फायदेशीर ठरतो.
  • कलिंगड चेह-यावर तावल्यास चेहरा ताजातवाणा होते आणि ब्लॅकहेड्सही दूर होतात.


- आमच्याकडे नैसर्गिक पध्दतीने पिकवलेले चांगले दर्जेदार टरबूज मिळतील. 


लेखक व उत्पादक शेतकरी

सचिन ठुबे (केंदळ रोड, ब्राम्हणी)

संपर्क - 9890911892

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !