शेवगाव : अतिक्रमणधारक यांच्या जागा मालकी हक्काच्या होण्याकरिता वंचित बहुजन आघाडीने शेवगांव पंचायत समिति येथे ठिय्या आंदोलन केले. वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने नायब तहसीलदार जोशी यांना निवेदन देण्यात आले. |
दोलनात प्रमुख्याने वंचित बहुजन आघाडीचे शेवगांव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख, शेवगांव तालुका संघटक प्रशांत निळ, अशोक शिंदे, सलीम जिलाणी शेख, बाळासाहेब भोसले, आश्पाक काळे, सौ निरचना काळे, जयराम भोसले, राजू शेख, सागर हवाले, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश ख़डांगळे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
मुक्ती फौज तळणी येथील धर्मशाळेच्या निर्णयाबाबत मेजर फिलीप जाधव, कॅप्टन जोसेफ पटारे, मेजर विश्वनाथ शिंदे, मेजर अनिल साळवे, लेप्ट विकास पवार, बाळासाहेब कसबे यांनी निवेदन दिले.