सावधान ! सतत हेडफोन्स वापरताय ? मग हे वाचा..

लाेकांमध्ये बहिरेपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढते ध्वनिप्रदूषण, ८० डेसिबलपेक्षा जास्त कर्णकर्कश आवाज, यामुळे श्रवणशक्ती कमी होते. तसेच सतत हेडफोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यामुळेही हा त्रास हाेताे. सध्या देशभरातील सुमारे ६.३ टक्के लाेक या आजाराने त्रस्त आहेत. 

हेडफोनचा अतिवापर, वाढते ध्वनिप्रदूषण, काही वेळा अपघात-आजार वा जन्मजात व्यंगामुळे बहिरेपणाचे रुग्ण वाढत आहेत. कानावर आवाजच पडत नसेल तर संवाद साधता येत नाही. परिणामी त्या व्यक्तीचे आयुष्य कठीण होते. मूकबधिर व्यक्तींचे आयुष्य तर अधिक कठीण असते. 

डीजे बँड वाजवणाऱ्या लोकांना बहिरेपणाची समस्या लवकर जाणवते. कंपनीमध्ये मोठमोठ्याने होणाऱ्या आवाजाचा परिणामही कामगारांवर होतो. हेडफोनचा अतिवापर टाळायला हवा. अनेकदा वाहन चालवताना हेडफोन्सचा वापर करणाऱ्यांचा अपघात झाल्याचे दिसून आले आहे.

मोठ्या आवाजामुळे बहिरेपणाच्या समस्या वाढत आहेत. हेडफोनवर सतत मोठ्या आवाजात ऐकल्यामुळे बहिरेपणाची समस्या जाणवते, असे अनेक रुग्णांच्या तपासणीतून जाणवते. ८० डेसिबल्सपेक्षा अधिक तीव्रतेचा आवाजामुळे श्रवणशक्ती कमी होते. त्यामुळे याबाबत काळजी घ्यावी.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !