अबब ! हे नगरसेवक चक्क महापालिका आयुक्तांच्या दालनात झोपणार ?

अहमदनगर - मुकुंदनगर प्रभाग तीनमधील पिण्याच्या पाणीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. या भागात नागरिकांना दोन ते चार दिवासाआड पाण्याचे वितरण होत आहे. पाणी प्रश्‍नासह घनकचरा, ड्रेनेजलाईन, बंद पथदिवे व रस्त्यांच्या प्रलंबीत कामे मार्गी लावण्याची मागणी नगसेवक आसिफ सुलतान यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

हे प्रश्‍न सुटले नाही, तर आयुक्तांच्या दालनात झोपा काढून आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी नगरसेविका रिजवाना शेख, सामाजिक कार्यकर्ते फारुक शेख, मोहसीन शेख आदी उपस्थित होते. 

मुकुंदनगर प्रभाग 3 मध्ये दोन ते चार दिवासाआड पाण्याचे वितरण होते. याला वितरण व्यवस्थेवरील दोष कारणीभूत आहे. लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. आगामी महिन्यात पवित्र रमजानचे उपास सुरू होणार आहे.

यामध्ये फेज टू पाण्याची पाईप लाईनचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. पाण्याची उंच टाकी बांधून आठ वर्ष झाली आहे. फेज टूचे राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना नवीन पाईपलाईन मधून नळ कनेक्शन देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

पाण्याची टाकी स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करून त्यातून पाण्याचे वाटप करावे, व प्रभागांमधील वॉल मॅनचा वेळ वाया जाणार नाही अशी व्यवस्था करण्यात यावी. तसेच वितरण व्यवस्थेचे दोष दूर करण्यासाठी कामगारांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

या भागात आहे पाण्याची टंचाई 

नशेमन कॉलनी, इशरद पार्क, छोटी मरियम मस्जिद, जीशान कॉलनी, एन. एम. गार्डन परिसर, सीआयव्ही. सोसायटी, नम्रता कॉलनी, सहारा सिटी, मेहराज मस्जिद परिसर, दर्गा दायरा, शहाशरीफ पार्क, संजोगनगर, दगडी चाल, अमर कॉम्प्लेक्स, अमन कॉलनी, अभिलाषा कॉलनी, हिना पार्क, हुसेनी कॉलनी, सहाजी पार्क, बिहारी चाल, कौसर बाग, दरबार कॉलनी, मोठी मरियम मस्जिद परिसर, अलमास पार्क, बजाज कॉलनी, इक्रा स्कूल परिसर

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !