हेही दिवस निघून जातील..

एका वर्षापूर्वी हा संसर्ग, त्याचे भयंकर परिणाम.. आजपर्यंतच्या आयुष्यात कधी मनी नाही असे प्रसंग आपण सर्वांनी अनुभवलेत. ते दिवस आठवले की, असे क्षण पुन्हा कधी कोणाच्या जीवनात येवू नयेत, अशीच विधात्याकडे प्रार्थना करतो..

काही दिवसांपूर्वी रोजचे जीवनमान पाहून वाटू लागलं होतं की गेला आता हा करोना.. होईल सारं काही पूर्ववत. आपणं मागील भयानक दाहक क्षण विसरण्याचा प्रयत्न करीत होतो. पण,

असं वाटू लागलं आहे, मधला काही काळ हा हॉरर सिनेमाच्या मध्यांतराचा होता. त्यानंतरचा पार्ट पुन्हा सुरु झालाय. खरेच, हेच वास्तव असेल... जळजळीत सत्य आहे न पचनारं.. रखरखीत दुष्काळ आहे हा तुमच्या आमच्या आयुष्यातील.. त्या आठवणी नकोच पुन्हा पुन्हा...

मागच्या प्रमाणेच येत्या काही दिवसांत शहरांतील आकडे पुन्हा वाढू लागले आहेत. भानावर यायला हवं. या करोनामुळे माणसाच्या जगण्याची ना आशा अन् मरण्याचं काही दुःख. काळजी केवळ सहीसलामत असण्याची. जीवावर उदार होऊन मानवतेचं सुंदर उदाहरण बनून इतरांच्या जीवनात हसू फुलवणारे नायक ही आहेतच..

पण हेही दिवस निघून जातील.. तोपर्यंत आपले आत्मबल महत्वाचे.. हे आत्मबलच आपल्याला सर्व संकटांवर आणि अडचणाींवर मात करायला शिकवणार आहे.

- जयंत येलुलकर (अहमदनगर)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !