ताजमहाल बाम्बने उडवून देण्याच्या धमकीने खळबळ

आग्रा : जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ ताजमहाल बॉम्बने उडवून टाकण्याच्या धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती.


अचानक सर्व पर्यटकांना आयएसएफच्या जवानांनी ताजमहालमधून बाहेर काढत परिसर रिकामा केला होता. परिसर ताब्यात घेतला आणि त्याठिकाणी सुरक्षा रक्षकांनी सर्च ऑपरेशन सुरू केले.  

ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्याने पर्यटकांमध्ये भीती पसरली होती. सुरक्षा रक्षकांनी बहुतांष पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे. ताज महालमध्ये सुरक्षा रक्षकांकडून मॉक ड्रिल करण्यात आल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !